परवाण्यापेक्षा जास्त गोंन खनिज उत्खनन करणाऱ्या अग्रवाल कंपनीवर करवाही करा

करियर करोबार खेल देश महाराष्ट्र राजनीति

**परवान्यापेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन करून विक्री करणा-या अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रा.लि.कंपनीवर कारवाईची मागणी**. ‌. ‌ सडक अर्जुनी:– तालुक्यातून नागपूर-रायपूर-कलकत्ता जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५३ वर कोहमारा ते देवरी दरम्यान उड्डाणपूलाचे काम अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करीत आहे.अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रा.लि.कंपनीने जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून २०००ब्रास मुरूम उत्खनन व वाहतूक करण्यासाठी परवाना सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड साजा क्र.६ येथील गट क्र.११३५ आराजी ५४.०२ पैकी अंदाजे ०.४० हे.आर. जागेतून २०००ब्रास मुरूम उत्खननासाठी डिसेंबर २०२३ मध्ये २६ डिसें२०२३ ते २५मार्च २०२४ पर्यंत परवाना मागितला होता.सदर उत्खनन व वाहतूक परवाना जिल्हा अधिकारी कार्यालय गोंदिया यांनी दिली होती.पण सदर कंपनीने २०००ब्रास ऐवजी २०००ब्रास पेक्षा जास्त तिनपट मुरूम पोकलॅंडचे सहाय्याने उत्खनन करून ८-१० टिप्परने वाहतूक करीत होते.परवानगी दिलेल्या तारखेपासून म्हणजे ९० दिवस ४ ते ५ हजार ब्रास मुरूम उत्खनन व वाहतूक केल्यानंतर सुद्धा खोदलेला मुरूम खदानीवर असल्याचे सांगून वाहतूक करण्यासाठी मुदत वाढवून मागितल्याची खात्रीलायक माहीती आहे.मोक्यावर मुरुम खोदकाम सुरू असतांनी सदर प्रतिनिधी घटनास्थळी जावून खोदकाम करीत असलेल्या पोकलॅंडचे ड्रायव्हरला विचारले असता,त्याने सांगितले की,परवानगीची तारीख वाढवून मागितली आहे.त्यावेळी मुरूम खोदकाम करीत असलेल्या पोकलॅंड ची फोटो घेवून जीपीएस १ एप्रिल २०२४ रोजी ६ वाजून ५९ मिनिट आहे.या प्रकरणाची तक्रार भामा चु-हे यांनी २४ जुन २०२४ रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील जितेंद्र ब्राम्हणकर,राधेशाम कांबळे,खोटोले यांचेसमवेत या अवैध मुरूम उत्खननाची तक्रार जिल्हा अधिकारी प्रजीत नायर यांना केली होती.अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रा.लि.कंपनी मुरदोली येथे कार्यरत असून या कंपनीकडे रिष्ट्रीय महामार्ग ५३ च्या उड्डाणपूलाचे कामाचे कंत्राट आहे.राष्ट्रीय महामार्गावरील शशिकरण पहाडी व मराबजोब येथील उड्डाणपूलाचे काम सुरू आहे.या कंपनीने सौंदड येथून उत्खनन केलेल्या मुरूमाची या कामासाठी परवानगी मागितली. या कामावर मुरूम वापरले,पण कंपनीने सौंदड-साकोली मार्गावरील चारगाव फाटा व श्रीरामनगर येथील धाबे वाल्यांना मुरूमाची विक्री केल्याचे मोक्यावरील चारगाव फाटा व श्रीरामनगर येथील तक्रारी मध्ये सुद्धा फोटो जोडले आहेत.सौंदड येथील गट क्र.११३५ आराजी ५४.०२ पैकी ०.४० हे.आर जागेत आज मोक्यावर १०० मी.रूंद पूर्व पश्चिम व ३००मी.लांब उत्तर दक्षिण ३ ते ४ मी.खोल खदानी केल्या आहेत. या खदानीचे मोजमाप केल्यास संपूर्ण प्रकार उघडकीस येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *