**बारामाही वनमजूरांवर उपासमारीची पाळी** **होळी पासून बारामाही वनमजूर वेतनापासून वंचित** सडक अर्जुनी:–वनपरिक्षेत्र सडक अर्जुनी अंतर्गत बाराही महिने जंगलाचे रक्षण करणा-या बारामाही वनमजूरांचे होळीपासून वेतन झाले नाही.होळीपासून बारामाही वनमजूरांना वेतनापासून वंचित ठेवून सणासुदीला म्हणजे पोळा,गणेश उत्सव सुद्धा वेतन न मिळाल्याने अंधारात आहेत.या बारमाही वनमजूरांचे वेतन न झाल्याने त्यांचेवर उपासमारीची पाळी आली आहे.परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न पडला आहे.वेतना अभावी सावकारांकडून कर्ज काढून परिवाराचा उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण व आरोग्याची काळजी करीत आहे. या बारामाही वनमजूरांचा वेतना अभावी दुर्गाष्टमी व दसरा सुद्धा अंधारात जाण्याचे चित्र आहे.शासनामार्फत लाडकी बहीन योजना राबवून लाडक्या बहिंनींना १५००रूपये प्रती महिना देऊन खुष करण्यात येत आहे.मात्र रात्र-दिवस जंगलाचे संरक्षण व गस्त करून जबाबदारी पार पाडत आहेत.या लाडक्या भावांना होळीपासून वेतनापासून वंचित ठेवले आहे.शासनाची जिम्मेदारी राखून ठेवणा-या या बारामाही वनमजूरांना वेतनाअभावी उपासमारीची पाळी आली आहे.वनमजूर सकाळी ८ ते सांय. ५ वाजेपर्यंत ईमानदारीने जंगलाची गस्त करून संरक्षण करतो .या वनमजूराला तुटपुंजे १३०००रूपये वेतन मिळते.ते पण वेळेवर होत नाही.उलट वनरक्षक हा वनमजूरावर जंगल सोडून एका महिन्यात एक दोनदा रस्त्याने व गावात फिरतो त्याला दर महिन्याने वेळेवर वेतन मिळते.परंतू जो जंगलाचे संरक्षण करतो त्याचे वेतन वेळेवर म्हणजे ५-६ महिने होत नाही.शासन या वनमजूरांची पिळवणूक करीत आहे.या बारामाही वनमजूरांचे त्वरीत वेतन वनविभागाचे वरिष्ठ अधिका-यांनी देण्याची मागणी वनमजूरांनी केली आहे.