*लाडक्या बहिणिंची ताकत जशी एसटीतून दिसली तशी विधानसभेच्या निकालातून विरोधकांना दिसेल*
*सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी खडकीः मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन*
*मेळाव्याला हजारो महिलांची उपस्थिती*
सडक अर्जुनी तालुक्यातील बामणी खडकी येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.
राजकुमार बडोले माझी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य,लक्ष्मीकांत धनगाये,रंजना भोई जिल्हा परिषद सदस्य गोंदिया,निशा तोडासे जिल्हा परिषद सदस्य गोंदिया,डॉक्टर भुनेश्वर पटले ,कविता रंगारी,पदमाताई परतेकी,दिपाली मेश्राम,विलास वट्टी,राजेश राऊत सरपंच प्रामुख्याने उपस्थित होते.
एसटी तोट्यात होती त्यातही राज्य सरकारने महिलांना ५० टक्के सवलतीची घोषणा केली. त्यावेळी आता एसटी बंद होईल अशी अफवा विरोधकांनी पसरली पण महिलांनी असा प्रवास सुरू केला की, अर्धी तिकीट देऊनही तोट्यात बसलेली एसटी फायदात आली. मातृत्व लाभ सुधारणा कायदा २०१७ मध्ये लागू करून महिलांना सक्षम बनवून नारीशक्तीच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यातील अडथळे दुर केले. या कायद्याने प्रसूती रजा १२ आठवड्यावरून ३६ आठवड्या पर्यंत वाढवले ५० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांना महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर सुविधा कायद्याने आता बंधनकारक केले. मुद्रा योजनेअंतर्गत मंजूर कर्जापैकी ६८ टक्के पेक्षा जास्त कर्ज महिला उद्योजकांना देण्यात आले संसदेत २०१९ मध्ये मुस्लिम महिला विवाह अधिकारांचे संरक्षण कायदा मंजूर केला त्याद्वारे तिहेरी तलाकद्वारे घटस्फोटाला आणि अवैध आणि बेकायदेशीर घोषित केले. त्यामुळे महायुती सरकारचा उद्देश आर्थिक समावेशापासून ते सामाजिक सुरक्षा दर्जेदार आरोग्यसेवा ते गृहनिर्माण आणि शिक्षण ते उद्योजकता आमच्या नारी शक्तीला भारताच्या विकास प्रवासात आघाडीवर ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत आणि ते येत्या काळात आणखी जोमाने सुरू राहतील असेही ते यावेळी म्हणाले. आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिला मेळाव्याला परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.