सडक अर्जुनी – महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना बळकटीकरण व सक्षमकरणासाठी विविध योजनांची आखणी केली आहे. मुख्यमत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत प्रती वर्ष ३ गॅस सिलेंडर मोफत देणार आहेत. गॅस सिलेंडर ची थेट रक्कम महिलांच्या खाते जमा करण्यात येणार आहेत. शिवाय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना १५०० रूपये प्रती महिने खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
राज्यातील महिलांना अधिकाधिक माहिती होण्यासाठी राज्यात जिल्हा परिषद क्षेत्रणीहाय महिलांचे भव्य मेळावे घेण्यात येत आहेत. दिनांक २२/०९/२०२४ ला जिल्हा परिषद पांढरी क्षेत्रात मा इंजी. राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य महिला मेळाव्यांना सुरवात जुजझालेली आहे. दिनांक २२/०९/२०२४ ला महिला मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.