आज दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोज शनिवार ला वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा गोंदिया यांची संयुक्त बैठक सडक अर्जुनी इथे श्री. महादेवजी सलामे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जिल्हा गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. या सभेमध्ये दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीबाबद देवरी विधानसभा व अर्जुनी/मोर विधानसभा छेत्रामध्ये आपला उमेदवार कश्या पद्धतीने निवडून आणता येईल या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. या प्रसंगी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष श्री भरतजी मडावी, महिला जिल्हा अध्यक्ष छायाताई टेकाम , मालतीताई कीन्नाके , ता. अध्यक्ष संतोषभाऊ धुर्वे, ता. सचिव राजेश मडावी, देवरी ता. अध्यक्ष टी.एन. सलामे तसेच वंचित बहुजन आघाडी सडक अर्जुनी चे तालुका अध्यक्ष सुखदास मेश्राम, अर्जुन/मोर तालुका अध्यक्ष किशोर तागडे , दिनेश पंचभाई वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता, अनिल उके, आदर्श रामटेके, राजेश मंडारी, रामलाल वट्टी, कृष्णा ब्राम्हणकर , किरणकुमार रामटेके, व इतर कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम रामटेके यांनी केले.