पोलीस स्टेशन डुग्गीपार
दिनांक 24/09/2024
शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणा-यांना डुग्गीपार पोलीसांचा दणका
सडक अर्जुनी= शालेय परिसराच्या 100 यार्ड परिसरात तंबाखुजन्य पदार्थ व सिगारेट विक्री करणा-या मौजा सौंदड, बिर्री, खजरी, केसलवाडा, सडक/अर्जुनी, घटेगाव, चिचटोला, पांढरी व बाम्हणी अशा एकुण 20 पानठेला चालकांवर डुग्गीपार पोलीसांनी कारवाई केली असून तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले आहे. सदरची कारवाई सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने अधिनियम कलम 6(ब), 24 अन्वये करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही मा.गोरख भामरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री.नित्यानंद झा सा. अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, श्री.विवेक पाटील सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री.मंगेश काळे पो.स्टे.डुग्गीपार, सफौ.निर्वाण, पोहवा खोटेले, राऊत, कोटांगले, रामटेके यांनी केली.