कार्यकर्त्यांनी बूथ मजबूत करून कामाला लागावे .
आमदार मनोहर चंद्रिकापुरे
सडक अर्जुनी = आगामी काळात विधानसभेची निवडणूक लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला बुथ अधिक मजबूत कसा करता येईल याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बूथ मजबूत असेल तर निवडणूक जिंकणे निश्चितच सुलभ होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला बूथ मजबूत कसा करता येईल याकडे लक्ष देऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागावे. असे आव्हान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
येथील बाजार समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बूथ कमिटी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीला प्रामुख्याने तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, माजी जि प सदस्य रतिराम राणे, श्रावण मेंढे, देवराम डोंगरवार, संजय ऊजवने, अलिसा पठाण सुनीता जयस्वाल, विजय कुंबरे प्रेम चांदेवार, देवेंद्र कोरे, हिरालाल तरजुलै, यादवराव कापगते गुलाब मडावी, नाजूक राम डोंगरवार, सुभाष आगासे, शितल लंजे, पल्लवी भुमके, प्रेमचंद बघेले, आशा साखरे, सरिता नाईक, मम्मी तामलये, दीपलता नाईक, विनंता पीपरे ,महेश आगासे, शैलेश शर्मा विकास बर्वय्या, प्रभाकर भोंडे, ज्योत्स्ना गोटेफोडे ,भुनेश्वरीमाकोडे ,प्रतिमा परिहार ,कविता पवार,गीता फरदे, सुमित्रा मेश्राम पूर्ण फरदे , तुळजा फरदे, सुनंदा लंजे, सीताबाई बघेले, पुष्पाबाई कोटी,, निलेश झोडे,आशिष बांगरे यांचे सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.