नितीमान समाज निर्मितीसाठी बुद्धाच्या धम्मा शिवाय पर्याय नाही
आ.मनोहर चंद्रिकापुरे
गौतम बुद्धाच्या अस्थि कलस महायात्रेला हजारो नागरिकांची उपस्थिती
सडक अर्जुनी =
तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वे आपल्या जीवनात आणण्याची गरज आहे. पंचशीलाचेआचरण करून जे जगले ते मोठे होऊन यशस्वी झाले. आपले आचरण शुद्ध झाले पाहिजे. विचारांची शिदोरी घेऊन जो नतमस्तक होतो ती ऊर्जा तुमच्यात आहे. नितिमान समाज निर्माण करायचा असेल तर बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन आमदार मनोहर चांद्रिकपुरे यांनी व्यक्त केले. ते चंद्रिकापुरे परिवार व इंडो एशियन मेहता फौंडेशन इंडिया याचे वतीने महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्धाच्या अस्थि कलश यात्रे निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीअर्जुनी मोरगाव येथील सभागृहात उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मंचावर डॉ अभिनेता चाय छनना
थायलंड,भंते सुमनरत्न थेरो श्रीनगर, डॉ. सुगत चंद्रिकापुरे, मंजू ताई चंद्रिकापुरे, भंते नागसेन, भंते लिहन खान लाव, भंते महामूगल्लाना, भंते प्रदीप थायलंड, भंते पेत सालस, भंते सिरी धम्म श्रीलंका, भंते धम्म राणे श्रीलंका, भंते खम्मी लॉस, भंते बनेडा,यांचेसह विदेशातून आलेले इतर भंते ,सचिन गजभिये, स्मिता चाक डेदिव्या चंद्रिका पुरे,,उपस्थित होते. अस्थि उपस्थित नागरिकांना भंते सुमन रत्न थेरो श्रीनगर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारून बुद्ध धम्माची दीक्षा दिली . यामुळे बुद्ध धम्माचा प्रसार अधिक जोमाने झाला मात्र बुद्धाचा धम्म टिकवून ठेवण्याचे काम आपण करावे असे आवाहन केले. यावेळी डॉ. अभिनेता चाय छन्ना यांनी थायलंड येथून आणलेली भेटवस्तू आमदार मनोहर चंद्रिकापुरे, डॉ.सुगत चंद्रिकापुरे व परिवारातील सदस्यांना दिली. अस्थि कलश यात्रा सडक अर्जुनी येथील तेजस्विनी लांन येथे पोहली दरम्यान उपस्थित नागरिकांनी अस्थींचे दर्शन घेतले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक भानसे, व बिरला गणवीर यांनी केले. तर आभार डॉ.सूगत चंद्रिकापुरे यांनी मानले. कार्यक्रमाला उपस्थित हजारो नागरिकांनी तथाग गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलसा चे दर्शन करून अभिवादन केले.