भंडारा जिल्ह्यात शासकीय विद्यकिय महाविद्यालय होणे ही जिल्हाशीयांसाठी आणि माझ्यासाठी आनंदाची बाब आहे – खा.डॉ.प्रशांत पडोळे
भंडारा:
भंडारा जिल्ह्यासाठी मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत काही चुकीची माहिती पसरवली जात आहे. जबाबदार व्यक्तींनी भ्रामक माहिती पसरवू नये, असे आवाहन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये केले आहे.
खोटा प्रचार करू नका:
खासदार डॉ.प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी पुढे सांगितले आहे की, ते स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. त्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रकल्पांच्या मंजुरी व निर्माण प्रक्रियेची सखोल माहिती आहे. काही व्यक्तींनी माध्यमांमध्ये भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे, ज्यात म्हटले आहे की सदर महाविद्यालय रद्द करण्यात आले आहे. याचवेळी, मुंबई येथे जाऊन आरोग्य विभागाच्या आयुक्तांशी या विषयावर चर्चा करण्यात आली होती. तसेच, नवी दिल्ली येथे जाऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामुळे आधी महाविद्यालय रद्द झाले असे सांगणे, आणि नंतर माझ्या प्रयत्नांमुळे ते मंजूर झाले असे प्रचार करणे हे सवंग लोकप्रियतेचे लक्षण आहे.
भेल परत आणण्यासाठी सहकार्य करा:
प्रत्यक्ष निवडणुकीत जनतेने नकार दिल्यानंतर देखील, संबंधित जनप्रतिनिधींनी “माजी” हा शब्द न वापरता “मा.” असा उल्लेख करून भोल्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ चर्चेत राहून स्वस्त लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न काहीही साधणार नाही. त्याऐवजी जनतेच्या खऱ्या प्रश्नांना आपल्याच सरकारसमोर मांडण्याचे धाडस दाखवावे. मुंडीपार येथे रद्द झालेल्या भेल प्रकल्पासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे.
मेडिकल कॉलेजची 100% खात्री:
खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी जनतेला आश्वस्त केले आहे की, भंडारा जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंमलबजावणीत कुठल्याही अडचणी नाहीत. श्रेयवादामुळे भ्रामक माहिती पसरवण्यात आली आहे. भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पाची 100% खात्री आहे. यानंतरही आवश्यकता भासल्यास, क्षेत्राच्या हितासाठी व समाजाच्या भल्यासाठी स्थानिक आमदार किंवा इतर जनप्रतिनिधींसोबत मिळून काम करण्यास कोणतीही अडचण होणार नाही.
राजकारण नको:
वैद्यकीय महाविद्यालयासारखे प्रकल्प समाजाकरिता, आरोग्यसेवेच्या मजबुतीसाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी आहेत. अशा प्रकल्पांमध्ये राजकारण आणणे योग्य नाही. काँग्रेसची विचारधारा आहे की राजकारण फक्त निवडणुकीपुरते असावे, आणि निवडणुका संपल्यानंतर लोकप्रतिनिधींनी समाजाच्या विकासासाठी काम करावे.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकल्पांमध्ये माझे योगदान कायम राहिले आहे आणि यापुढेही राहील. एक जबाबदार खासदार आणि काँग्रेस कार्यकर्ता म्हणून, मी नेहमीच लोकहितासाठी काम करत राहणार आहे.
भंडारा जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय सुरू होणे माझ्या जिल्हाशीयांसाठी अभिमानाची गोस्ट आहे. इथला मुलगा शिकून त्यांनी समाजाची सेवा करावी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उदघाटन होते आहे ही आनंदाची बाब आहे. मी नेहमीच क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच अग्रेशीत राहीन असेही भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ. प्रशांत पडोळे यांनी यावेळी सांगितले