युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे. सुरज चव्हाण राष्ट्रवादी पार्टी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष

महाराष्ट्र राजनीति

युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे. सुरज चव्हाण
राष्ट्रवादी पार्टी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष
सडक अर्जुनी
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा असा एक पक्ष आहे जो विकासाचे राजकारण करतो. प्रत्येक कार्यकर्त्यांची हीच भूमिका असली पाहिजे की, ज्या योजना आपल्या सरकारने आणल्या त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे. या मतदारसंघाचे आमदार यांनी अनेक विकास कामे खेचून आणली नेहमी विकासाची भूमिका त्यांनी डोळ्यासमोर ठेवली. त्याच पद्धतीने या मतदारसंघाच्या चेहरा मोहरा कसा बदलता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपल्या नेत्याचे व्हिजन हे विकासाचे आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आपण सर्व कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी व्यक्त केले.ते अर्जुनी
मोरगाव विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे वतीने आयोजित भव्य मेळाव्याप्रसंगी उपस्थित युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तेजस्विनी लांन सडक अर्जुनी येथे मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते पुढे ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो निर्णय घेतला तो विकासासाठी घेतला समाजातला शेवटचा घटक विकासाच्या प्रवाहत आला पाहिजे. समाजातल्या सगळ्या घटकासाठी वेगवेगळ्या योजना आमच्या सरकारने आखल्या आहेत. महिलांच्या सन्मान करण्याचे काम अजित दादांनी केलं . विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षम होत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन यांनी सुद्धा याप्रसंगी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना युवक हा पुढे आला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक मोठा पक्ष म्हणून पुढे येईल. महिला आणि युवकांसाठी काम करणारी पार्टी जर कोणती असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीआहे.असे मत व्यक्त केले. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मतदार संघात सिंचन सुविधा यासह मतदार संघात रस्त्यांची झालेली मोठी विकास कामेव इतर विकास कामे यासंदर्भात मार्गदर्शन करून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला बूथ सक्षम करावा असे सांगितले . मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष केतन तूरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष जगदीश पंचबुधे, डॉक्टर संदीप मेश्राम, इंजि.यशवंत गणवीर, डॉ. सुगत चंद्रिकापुरे, जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष दानेश साखरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ.अविनाश काशिवार, लोकपाल गहाणे, महिला अध्यक्ष रजनी गिरेपुंजे , सुशीला हलमारे, नगराध्यक्ष तेजराम मडावी, न. प .सभापती दीक्षा भगत, नगरसेवक आनंद अग्रवाल, नगरसेविका शशिकला टेंभुर्णी, कामिनी कोवे, तालुका युवक अध्यक्ष किशोर ब्राह्मणकर, राहुल यावलकर, सुरेंद्र रंहांगडले, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *