उपविभागीय कार्यालयात वनहक्क जमिनीचे पट्टे वाटप
अर्जुनी मोरगाव
बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे वन हक्क पट्ट्याचे वाटप काल तारीख 7 रोजी उपविभागीय कार्यालय अर्जुन मोरगाव येथे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते , अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे,यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मागील बऱ्याच वर्षापासून वन जमिनीवर ज्या शेतकऱ्यांनी आपला हक्क बजावून जमीन कसण्याचे काम सुरू ठेवले होते. त्या शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता तहसील कार्यालयाकडे केली होती. कागदपत्रांची पडताळणी करून काही शेतकऱ्यांना वन हक्क जमिनीचे पट्टे वाटप करण्यात आले यामध्ये धनराज लहानू राहाटे, वच्छला नथू जगझापे, सुखदेव गोपाळा व घारे, नामदेव आत्माराम मस्के, भीमराव मारोती बारसागडे,अजित खा रमजान खा पठाण,गुलाब नीलकंठ ठवरे, रत्नमाला नीलकंठ ठवरे, रवींद्र श्यामराव ठवरे, हरी इस्तारी लांजेवार आदींना पट्टे वाटप करण्यात आले. पट्टे वाटत संदर्भात आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता केल्या नंतर पुढेही उर्वरित नागरिकांना पट्टे वाटप करण्यात येणार आहे.