केंद्रस्तरीय तीन दिवसीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन
सडक अर्जुनी=
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा शेंडा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी द्वारा तीन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .यामध्ये शासकीय आश्रम शाळा शेंडा ,शासकीय आश्रम शाळा ईडदा, अनुदानित आश्रम शाळा देवलगाव,गोठणगाव,केसोरी,खडकी बामणी,शिरेगावबांध,धाबे पवनी या आठ शाळेतील 475 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून करण्यात आली.या कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकला डोंगरवार जिल्हा परिषद सदस्य गोंदिया,एस. एस. देशमुख कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी देवरी,ईश्वर कोल्हारे प्रहार जनशक्ती देवरी,डॉक्टर संजय .डी .गोटमवार मुख्याध्यापक शासकीय आश्रम शाळा शेंडा,अरविंद मरोस्कोले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आश्रम शाळा शेंडा,अल्लाउद्दीन राजानी पंचायत समिती सदस्य सडक अर्जुनी,ग्यारशी रामरामे सरपंच शेंडा,डॉक्टर. दीप्ती उपराडे प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडा,रजनी वाढवे .आश्रम शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष,वंदना वाढवे,वामन लांजेवार लोकमत पत्रकार,कृपासागर जनबंधू,चंद्रमुनी बनसोड, यशवंत सलामे, प्रकाश पुराम, ओमकांत पंधरे ,मंचावर उपस्थित होते.या तीन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेला आज सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी एस पी खोब्रागडे मॅडम यांनी केले व आभार .सुधा बारस्कर मॅडम यांनी मांडले.