ग्रामीण रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा.
सडक अर्जुनी.
नामदार उच्च न्यायालय बॉम्बे व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती, सडक अर्जुनी, वकील संघ व ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात 10 ऑक्टोंबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायधीश डॉ. विक्रम अं. आव्हाड, ऍड. एस .बी. गिऱ्हेपुंजे, सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही . मेश्राम, ऍड. कुंदन रामटेके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत तुरकर, डॉ. अनिल आटे दंतचिकित्सक, डॉ. शुभांगी आगाव, डॉ. नितीन पाटील, कु. सुमेधा नितीन अभंग, दिवाणी न्यायालय सडक अर्जुनी येथील सर्व कर्मचारी वृंद, वकीलवर्ग व ग्रामीण रुग्णालय येथील सर्व कर्मचारी वृंद व रुग्ण उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. तुरकर , डॉ. आटे, डॉ. आगाव सहा.अधीक्षक वि.पी शिवणकर यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश डॉ. विक्रम अं. आव्हाड यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्य काळजी अधिनियम 2017 बद्दल बोलतांना त्या कायद्याची स्थापना, अंमलबजावणी, त्याचे महत्त्व, उद्देश तसेच मानसिक रुग्णाचे त्या कायद्यात काय अधिकार आहेत आणि अशा मानसिक रुग्णांबद्दल नागरिकांचे काय कर्तव्य आहे. हे सविस्तर आपल्या भाषणातून सामान्य माणसाला कसे समजेल व तो आपल्या आचरणात कसे आणून त्या रुग्णांची मदत करू शकतो हे सांगितले. कायद्याचे शिक्षण घेत असलेली विद्यार्थ्यांनी कु. सुमेधा नितीन अभंग यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात हा दिवस का साजरा करतात. या दिवसाचे महत्व, उद्देश,गरज या गोष्टींवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला तसेच डॉ. प्रशांत तुरकर व डॉ. अनिल आटे यांनी आपल्या भाषणात मानसिक रुग्णाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन एकसारखाच असतो.मानसिक रुग्णांचे प्रकार भिन्न असतात. त्यांची काळजी कशाप्रकारे घेतली जाऊ शकते. मानसिक रोग वाढण्याची कारणे त्यावर उपाय यावर त्यांनी सविस्तर समजावून सांगितले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन पाटील यांनी करून आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सडक अर्जुनी न्यायालयीन कर्मचारी,वकील संघ व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.