मंगळवारी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांची सभा.
सडक अर्जुनी.
अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्र
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने
सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालया समोरील पटांगणावर
मंगळवारी (ता. 22)
सकाळी 10 वाजता राष्ट्रीय प्रबोधणकार अनिरुद्ध शेवाळे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. तसेच एस सी, एस टी,ओबीसी,भटके विमुक्त, अल्प संख्यांकाचे हक्कासाठी दुपारी 12 वाजता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर प्रबोधनात्मक कार्यक्रम व जाहीर सभेला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजक दिनेश रामरतन पंचभाई यांनी केले आहे.