डॉ.सुगत चंद्रिकापुरे विधानसभेची निवडणूक लढणार
सडक अर्जुनी
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिका पुरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट कापून भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर केल्याने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील पक्षाच्या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. मात्र पुनश्च अर्जुनी मोरगाव विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी आता आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी कंबर कसली असून प्रहार संघटनेच्या पाठिंब्याने विधानसभेची निवडणूक लढणार असा विश्वास त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना व नागरिकांना दिला.
कोहमारा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज दि .24 रोजी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील शेकडोच्या संख्येत आलेल्या कार्यकर्ते व नागरिका मनात तिकीट न मिळाल्याची खंत असल्याने व डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे हे विधानसभेचे निवडणूक लढविणार असल्याने उमेदवारीला घेऊन आलेल्या कार्यकर्ते व नागरिकांच्या मनात सहानुभूतीची लाट दिसून आली. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला प्रामुख्याने प्रहार संघटनेचे पदाधिकारी तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी येणारी विधानसभेची निवडणूक आपण उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांच्या बळावर निश्चितच जिंकून येऊ असा विश्वास डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी उपस्थित नागरिकांना दिला. डॉक्टर चंद्रिकापुरे यांना निवडणुकीत हमखास आपण समर्थन करणार असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. आज दुपारपासूनच जनसंपर्क कार्यालयात शेकडो नागरिकांची वर्दळ दिसून आली. यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात तिसरी सक्ती मोठ्या ताकतीने ही निवडणूक लढणार असल्याचे दिसून येत आहे.