डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांच्या भव्य रॅलीने मोठ्या पक्षाच्या उमेदवारांना भरली धडकी
सडक अर्जुनी
अर्जुनी मोरगाव विधानसभेच्या निवडणुकीकरिता आज दिनांक 29 रोजी प्रहार जनशक्ती संघटनेचे उमेदवार डॉ.सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान अर्जुनी मोर येथे ठोल ताश्याच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली होती. शक्ती प्रदर्शन करीत हजारोंच्या संख्येत नागरिक सहभागी झाले असून या रॅली ने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे राष्ट्रीय व राज्य पक्षाच्या उमेदवारांना धडकी भरली .या रॅली मध्ये प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू आमदार मनोहर चंद्रिकापुरे याचे सह प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महायुतीकडून आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची तिकीट काटून या मतदार संघाची तिकीट त्यांना न मिळाल्याने आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी ही निवडणूक मोठ्या ताकतीने आणि उमेदीने लढण्याची इच्छा व्यक्त करून जनशक्ती प्रहार संघटनेच्या पाठिंब्याने निवडणूक लढविणार असून आज त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना हजारोच्या संख्येत नागरिकांनी रॅलीत सहभागी होऊन सहानुभूतीची लाट कायम असल्याचे संकेत दिले.