वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिनेश पंचभाई यांचा उमेदवारी अर्ज दाखल
*सडक अर्जुनी:* ६३-अर्जुनी मोर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिनेश रामरतन पंचभाई यांनी सोमवार दि.२८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपविभागीय कार्यालय अर्जुनी मोरगांव येथील उपविभागीय अधिकारी वरूनकुमार शहारे यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिनेश पंचभाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्जुनी मोर शहरातील दुर्गा चौक येथून भव्य अशी वाजत गाजत रॅली काढण्यात आली. अर्जुनी मोरगांव शहरातील अंबिका वस्रालय ते सरळ खरेदी विक्री, महाराणा प्रताप चौक सरळ मेन रोड उपविभागीय कार्यालय या मार्गे रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीचा समारोप उपविभागीय कार्यालयासमोर करण्यात आला. या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.सतीश बन्सोड वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष महादेव सलामे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव राजू राहुलकर अर्जुनी मोरगाव तालुकाध्यक्ष किशोर तागडे, सडक अर्जुनी तालुकाध्यक्ष सुखदास मेश्राम, अर्जुनी मोरगाव युवा तालुकाध्यक्ष कैलास इस्कापे सडक अर्जुनी युवा तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम रामटेके, अनिल उके, आदर्श रामटेके हर्षपाल लोणारे, रोहित रामटेके, लोमेश सांगोळे, प्रतिक रामटेके बाबूदान मेश्राम, आकाश तागडे आणि सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.