कुंनबी समाजावर आक्षेप टिप्पणी केल्याप्रकरणी डूगगीपार पोलिश स्टेशन मध्ये गुन्हा दाखल कऱण्यात याव करिता निवेदन देण्यात आले

अपराध महाराष्ट्र

कुंनबी समाजावर आक्षेप टिप्पणी केल्याप्रकरणी डूगगीपार पोलिश स्टेशन मध्ये गुन्हा दाखल कऱण्यात याव करिता निवेदन देण्यात आले
सडक अर्जुनी= कुणबी समाज संघटना सडक अर्जुनी च्या वतीने
सध्या निवडणुकीचा काळ सुरू आहे प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचा प्रचार करीत आहेत परंतु समाज माध्यमांमध्ये एक बातमी झपाट्याने प्रसारित होत आहे भाजपच्या प्रचार कार्यालयात सुधीर माळी नामक भाजप कार्यकर्ता कुणबी समाजाबद्दल आक्षेप टिपणी करीत असल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहै. साले कुनबी पाचशे रुपये विकले जाते कुणब्यांची अवस्था इलेक्ट्रिक खांबावर मूतणाऱ्या कुत्र्यासारखी आहे  अशी अभद्र टिपणी केल्याबद्दल सडक अर्जुनी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कुणबी समाज नाराज होऊन त्या भाजप कार्यकर्त्याच्या निषेध करत आहेत. आज दि.07 नोव्हेंबर रोजी कुणबी समाज संघटना सडक अर्जुनी च्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या मीटिंगमध्ये आमदार माजी मंत्री असे असताना वनी मध्ये कुणबी समाजाला कुत्र्याची उपमा दिली त्याबद्दल सडक अर्जुनी तालुक्यांतील सर्व कुणबी समाजातर्फे तालुका सडक अर्जुनी च्या वतीने जिल्हा पोलिश अधीक्षक गोंदिया. S.D.M. कार्यलय मोरगाव अर्जुनी .व डूगगीपार पोलीस स्टेशन येथे ठाणेदार निलेश काळे. यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करावा व निषेध व्यक्त करण्यात आला
ह्यावेळी अनिल मुनेश्वर. तुलसीदास शिवणकर. दिनेश होकरे. अंकित भंडारकर. देवचंद तरोने. राजेश कोरे. किशोर शेंडे.अरविंद मेंढे.प्रेमालाल हत्तीमारे. निखिल मुनिस्वर.देवानंद कोरे.धनिराम ब्राह्मणकर. उपस्थीत होतें अशी महिती किशोर शेंडे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *