उद्या बच्चू कडू यांची सडक अर्जुनी मध्ये जाहिर सभा
हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
सडक अर्जुनी= प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्ष प्रमुख तथा माजी राज्यमंत्री नामदार बच्चू भाऊ कडु यांच्या उद्या दि. 10 नोव्हेंबर ला सडक अर्जुनी व मोरगांव अर्जुनी तालुक्यात प्रहार चे उमेदवार डॉ सुगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौरा करत असून बच्चू भाऊ कडु हे कुरुडपूर्णा जिल्हा अमरावती येथून हेलिकॉप्टर ने सडक अर्जुनी येथिल ग्रामिण रुग्णालय च्या समोरील प्रांगणात हेलिकॉप्टर ने येणारं आहेतं अशी महिती प्रहार जनशक्ती पक्षाचे गोंदिया जिल्हा प्रमूख महेंद्र भांडारकर यांनी दिली आहे.
सकाळी 11 ते 12 वाजता पर्यन्त सभा होणार आहे.त्या नंतर बच्चू भाऊ कडु हे प्रहार चे अपक्ष आमदार सुगतं चंद्रिकापूरे यांच्या प्रचार दौरा करत असून 12 वाजता सडक अर्जुनी वरून मोरगाव अर्जुनी करीता रवाना होनार आहेतं.
प्रहार चे गोंदिया जिल्हा अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे सम्पूर्ण कार्यकर्ता तसेच बच्चू भाऊ कडु समर्थक व बच्चू भाऊ चे विचार ज्यांना आवडतात व संपूर्ण मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान केले आहे.