डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौऱ्याला प्रतिसाद अनेक गावात फटाक्याची अतिशय बाजी करून उमेदवाराचे स्वागत सडक अर्जुनी =

महाराष्ट्र राजनीति

डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौऱ्याला प्रतिसाद

अनेक गावात फटाक्याची अतिशय बाजी करून उमेदवाराचे स्वागत

सडक अर्जुनी =

प्रहार जनशक्ती पक्ष ,परिवर्तन महाशक्ती व गोंडवाना गणतंत्र पार्टी यांचे संयुक्त विधानसभा क्षेत्राचे अधिकृत लोकप्रिय युवा उमेदवार डॉ. सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौरा मतदार संघातील शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रातून सुरू करण्यात आला. तर काल पासून अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रचार सुरू असून नवेगाव बांध जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात पोहोचून आपल्या प्रचार दौऱ्याप्रसंगी गावातील नागरिकांचे तसेच मतदारांचे आशीर्वाद घेतले. व आज गोठनगाव जी प. क्षेत्रातील विविध गावातील महिलांनी ओवाळणी करून उमेदवार डॉ सुगत चंद्रिकापुरे यांना कुंकू टिलक व हार घालून तसेच पुष्पगुच्छ देऊन निवडणुकीकरिता शुभेच्छा दिल्या. या प्रचार दौऱ्यात मोठ्या प्रमाणात युवकाचा सहभाग असून युवा नेतृत्वाच्या पाठीशी आम्ही कणखर उभे राहनार असून तुमच्यासोबत निवडणुकीत आहोत असा विश्वास युवा पिढीने दिला .प्रचार दौऱ्या प्रसंगी प्रत्येक गावात फटक्याचाची आतिषबाजी करून उमेदवाराचे स्वागत करण्यात येत आहे. प्रचार दौऱ्याप्रसंगी केवळ जिल्हा परिषद क्षेत्रातील नव्हे तर विधानसभा क्षेत्रातील युवा मोठ्या संख्येने प्रचार सभेत उपस्थित होत आहेत.त्यांच्या प्रचार दौऱ्यातील युवा समर्थनाने मतदारांमध्ये आता तिसऱ्या आघाडीशिवाय आपल्याला पर्याय उरला नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय व राजकीय पक्षाच्या उमेदवारांना धडकी भरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *