कष्टकरी ,कामकरी माणसाच्या समस्या दूर झाल्या पाहिजे .
बच्चू कडू
निवडणूक प्रचारार्थ सडक अर्जुनीत बच्चू कडूच्या सभेला उस्फूर्त प्रतिसाद
सडक अर्जुनी
माझ्या कष्टकरी , कामकरी गोरगरिबांच्या समस्या मार्गी लागणे गरजेचे आहे.
ज्या योजना मोठ्यांना मिळतात , त्या योजना गोर गरिबांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे .
शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही, मायबाप शेतकऱ्यांना न्याय देउन , शेतकरी, कष्टकऱ्यांची ही आमची लढाई आहे , ज्यांना हात नाही ,पाय नाही, डोळे नाही, अशा दिव्यांग व्यक्तींसाठी ही संघटना धावून जाते , माझे हात मजबूत करण्यासाठी डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांना आमदार करण्याची गरज आहे , असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.
प्रहार संघटनेचे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू सडक अर्जुनी येथील पंचायत समिती जवळील मैदानात उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते
पुढे ते म्हणाले सरकार शेतकऱ्यांना धनासाठी जे रेट ठरवून देते त्यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत असून शेतकऱ्यांनी जागे होण्याची गरज आहे .
यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे , डॉ. सुगत चंद्रिकापुरे , किरण कोरे, प्रहार चे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर , तिरोडा येथील पंचायत समिती सदस्य वनिता भंडारकर ,वसंत गहाणे, सरपंच माधव तरोणे , गोंडवाना गोंड तंत्र संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्ष छायाताई टेकाम , वनिता भंडारकर , मंगेश देशमुख, राष्ट्रपाल तेलतुंबडे, दुलाराम चंद्रिकापुरे,प्रतिभा कुंभरे, मंजुषा चंद्रिकापुरे, दिव्या चंद्रिकापुरे, शशिकला टेंभुर्णी, रघुनाथ चुटे, प्रमिला बहेकार आदी मान्यवर उपस्थित होते,
आमदार चंद्रिकापुरे, डॉ .सुगत चंद्रिकापुरे , किरण कोरे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन राहुल यावलकर यांनी तर आभार चंद्रशेखर चांदेवार यांनी मानले. सभेला हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.