शिवशाही बस चा भीषण अपघातात 10 ते 12 प्रवाशांचां मृत्यू

करोबार महाराष्ट्र राजनीति स्वास्थ्य

सडक अर्जुनी= गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जूनी तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम खजरी डव्वा गावा जवळ आज दिनांक 29 नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास 1 वाजता भंडारा वरूण गोंदियाकडे प्रवासी घेऊन जाणारी शिवशाही बस क्रा MH 09 Emb1273 चा भीषण अपघात झाला हा अपघात सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी डव्वा गावा जवडा झालं
प्राप्त माहितीनुसार ह्या अपघातामध्ये 10 ते 12 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालय डावा व गोंदियाला तात्काळ पाठवण्यात आले आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली असावी असा प्राथमिक अंदाज जनतेचा आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन राष्ट्रीय राज्य महामार्ग परिवहन मंडळ साकोली गोंदिया भंडारा व महामार्ग पोलीस यांचा ताफा घटनास्थळी गाठून जखमींना व मृत्यू झालेल्या प्रवाशांना बचाव कार्य सुरू करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन जखमींना चांगले वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहे
मृत्याची नातेवाहिकांना कुटुंबीयांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशी जनतेची ❤️मागणी आहे ह्या भयानक अपघातामुळे स्थानिक परिसरात व गोंदिया जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *