ब्लॉसम शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली एसबीआय बँकेला भेट

मनोरंजन महाराष्ट्र

ब्लॉसम शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली एसबीआय बँकेला भेट
December 2, 2024

देवरी: उपक्रमशील संकल्पना राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचा सतत प्रयत्न करणारे ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरीचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावा या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसह एसबीआय बैंकला भेट दिली. या भेटीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून एसबीआय बँकचे व्यवस्थापक श्रीकांत चेटूले यांनी मोलाची भूमिका पार पाडली.

विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्यापासून तर चालान तयार करणे, पास बुक तयार करणे, लॉकर, रोकड जमा व काढणे, डी.डी. तयार करणे, आर.डी. काढणे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, साइबर क्राइम , व्याज, चक्रवाढ व्याज तसेच लोनपासून तर इंटरनेट बँकिंगपर्यंतची सर्व माहिती यावेळी देण्यात आली. प्रत्यक्षात दिलेले शिक्षण हे दीर्घकाळ लक्षात राहते आणि व्यावहारिक जीवनात त्याचा नीट उपयोग करता येते या उद्देशाने सदर भेट आयोजित केलेली होती. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर बँकेचे व्यवहार करणे भाग पडते, त्यांना समोर कुठलीही समस्या पडू नये हा या मागचा हेतू. विद्यार्थ्यांनी व्यवस्थापक यांना त्यांनी बँकिंग क्षेत्रातील प्रश्न विचारले. यावेळी बँक अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्व अधिकाऱ्यांचे डॉ. सुजित टेटे यांनी आभार मानले. या भेटीला मूर्तरूप देण्यासाठी शिक्षक नामदेव अंबादे यांनी मोलाचे कार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *