बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी Breaking News

महाराष्ट्र राजनीति शिक्षा

बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी
Breaking News December 3, 2024

अर्जुनी मोरगाव:- तालुक्यातील गोठणगाव, येथे १ डिसेंबर २०२४ला – धक्कादायक घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात एक ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता घडली. मुदुल रुपेश नंदेश्वर (वय ३ वर्षे) राहणार अरततोंडी(जुनी) तालुका कोकोळी जिल्हा गडचिरोली हा आपल्या आई-वडिलांसोबत रिस्तेदाराकडे गोठणगाव येथे मंडई निमित्त आला होता आणि अंगणात खेळत असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला.

त्यांच्या वडिलांनी चिल्कार ऐकताच तत्काळ मुलाकडे धाव घेतली. त्यांनी बिबट्याला हाकलून लावले, मात्र बिबट्याने पुन्हा हल्ला चढवला. मुलाच्या वडिलांनी मोठ्या धाडसाने बिबट्याला दुसऱ्यांदा दूर केले. त्यानंतर मुलाला तातडीने गोठगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून त्याला पुढील उपचारांसाठी अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले. सध्या मुलावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे. या घटनेमुळे गोठणगाव आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे कठोर उपाययोजनां करीता तक्रार केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *