घाटबोरी/ कोहळी येथे 17 डिसेंबरला मानवधर्माचे भव्य सेवक संमेलनाचे आयोजन.
सडक अर्जुनी.
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या सौजन्याने तसेच सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व सेवकांच्या सहकार्याने घाटबोरी/ कोहळी येथे दि. 17 डिसेंबर 2024 ला मानव धर्माचे भव्य सेवक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक वासुदेव पडोळे नागपूर यांचे हस्ते, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष रामू मदनकर नागपूर, यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार इंजि. राजकुमार बडोले,माजी आमदार राजेंद्र जैन, जी. प.सदस्य निशाताई तोडासे, प. स.सदस्य डॉ. रुखिराम वाढई, सरपंच भूमिकाताई बाळबुधे, सरपंच उषाताई मेश्राम, पो.पा.विकास लाडे, पो .पा. हेमलता बावनकर, तंमुस अध्यक्ष नरेश लंजे, सामाजिक कार्यकर्ते प्रेमलाल लंजे, सुरेश गहाणे ,नलिनी लंजे,कैलाश परशुरामकर,टॉनिक लंजे,चंदू लंजे,महेश सोनवाणे, चुन्नीलाल बन्सोड,जगन्नाथ लंजे,अमोल बन्सोड, शंकर लंजे, राजू कापगते, देवराम लंजे, देवचंद नागोसे, ईश्वर ठाकरे, दिलीप वैद्य, मिताराम शेंडे, ओमप्रकाश डोंगरवार, शिक्षक फटे, कापगते, पो.पा. बन्सोड, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे पदाधिकारी उपाध्यक्ष मनोहरराव देशमुख, सचिव सूरजलाल अंबुले,सहसचिव मोरेश्वर गभणे, कोषाध्यक्ष प्रवीण ऊराडे, संचालक टीकाराम भेंडारकर, संचालक फकिरा जिभकाटे,संचालक संजय महाकाळकर, विठ्ठलराव क्षीरसागर यांचेसह इतर मान्यवर उपस्थित राहतील.सकाळी 6. 30 वाजता सामूहिक एकतेचे हवनकार्य व तीर्थप्रसाद , सकाळी 8 ते 12 वाजताच्या दरम्यान मानवधर्माची भव्य शोभायात्रा, दुपारी 12 वाजता दीप प्रज्वलन व संमेलनाचे उद्घाटन,दुपारी 1 ते 4 वाजताच्या दरम्यान मानव धर्म शिकवणुकीवर परिसंवाद व चर्चासत्र, सायंकाळी 4.30 वाजता स्नेहभोजन, सायंकाळी 6.30 वाजता राम कोहपरकर यांच्या वाणीतून भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक व मार्गदर्शक शेषराव मौजे , मार्गदर्शक शालिन्दर कापगते, मार्गदर्शक श्रीपत थेर, परसराम सलामे, बेनिराम चांदेवार, राजकुमार बावनकर, कुंभराज लांजेवार, मुरलीधर भांडारकर, रतिलाल भोंडे तसेच कार्यकारिणीचे अध्यक्ष ताराचंद कांबळे, उपाध्यक्ष विश्वनाथ राऊत,सचिव रमेश लंजे,विनोद कांबळे, भाऊराव राऊत, जगदीश शेंडे ,विनोद काळसर्पे,भोजराज लंजे, दुलीचंद कवाडकर, युवराज मानकर यांनी केले आहे.0