रेंगेपार/दल्ली येते ४ दिवसात अर्धा डझन अपघात
आमदर साहेब लक्ष द्याल का…?
सडक अर्जुनी= तालुक्यांतील ग्राम
रेंगेपार, परसोडी घाटावर वाळू माफियांच्या कहर रात्रभर चालत असल्याचे चित्र आहे सद्या थंडी जोर मारत असल्यामुळे रेती चोरीचा कहर वाढलेला दिसत आहे. रेती चोरी करणारे ट्रॅक्टरचा मागचा पल्ला खुला सोडल्याने रेंगेपार ते सडक अर्जुनी रोडवर वाळू पसरलेली असल्यामुळे ४ दिवसात डझन भर अपघात झाल्याचे चित्र आहेः.चार चाकी रस्ता सोडून बाजूला पुलात गेली त्यात एक शिक्षकाला गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगितले जात आहे.तसेच शनिवार ला दोन चाकी स्लीप झाल्याने मोटरसायकल चालकाचा हात मोडल्याचा प्रकार घडला असे एकूण अर्धा डझन अपघात पाहायला मिळाले परिणामी रेंगेपार गावातील समाज कंठक समोर आले आणी हातात झाडू घेऊन रस्त्याची सफाई करत नरेंद्र डोंगरवार, डेवीड मेश्राम, दादू मुंगुलमारे व विशाल डोंगरवार ह्यांनी वाळू चोरी करणारे यांच्या फोन वरून संपर्क करून दाद देण्यांत आली की परत रस्त्यावर रेती पसरलेली दिसली व कोणतीही जीवित हानी घडली तर दांडाधिकारी अक्षय पोयाम . व उपविभगिया अधिकारी वरुण कुमार शहारे यांच्या कडे तक्रार करण्यात येईल असे सांगून गावातून.रेती वाहतुक बंद करण्यात यावी असे सांगण्यात आले अशी महिती पत्रकर यांना नरेंद्र डोंगरवार यांनी दिली