लोहिया विद्यालयात अल्पसंख्याक अधिकार दिवस साजरा
सडक अर्जुनी= -लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सौंदड येथे आज दिनांक 18 डिंसेबर 2024 रोज बुधवारला विद्यालयात संस्थापक – संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने प्राचार्या मा.उमा बाच्छल यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्याध्यापक मा. मनोज शिंदे, पर्यवेक्षक मा.डी. एस. टेभूर्ण, प्राध्यापक मा.आर.एन.अग्रवाल यांच्या उपस्थितीत ‘अल्पसंख्याक अधिकार दिवस’ साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांनी विद्यार्थीयाना मार्गदर्शन केले. विद्यालयातील स. शिक्षक श्री टी. बी. सातकर यांनी अल्पसंख्याक अधिकार दिनाचे महत्त्व विदयार्थ्यांना समजावून दिले. तसेच विद्यालयात या विषयावर आधारित निबंध,चित्रकला व वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहा.शिक्षक श्री आर. आर. मोहतुरे यांनी केले.