परभणी प्रकरणातील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी. ( बौद्ध समाजाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन )

करोबार महाराष्ट्र राजनीति

परभणी प्रकरणातील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी.
( बौद्ध समाजाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन )

सडक अर्जुनी.

परभणी येथील स्टेशन रोड भागातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयालगत संविधानाची सिमेंटपासून बनविलेली प्रतिकृती असून तिला काचेचे आवरण होते. दि. १० डिसेंबर २०२४ ला एका माथेफिरुने संविधान प्रतिकृतीचे काच फोडून विटंबना केली. त्यामुळे सदर घटनेचा निषेध करीत संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरुवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेल्या सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी (वय – ३५, रा. शंकरनगर, परभणी) या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सदर युवकाच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.अशी मागणी बौद्ध समाजबांधवांच्या वतीने करण्यात आली असून तसे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना 17 डिसेंबर 2024 ला पाठविण्यात आले आहे.
तहसीलदार अक्षय पोयाम यांना निवेदन देतांना विदेश टेंभूर्णे, भाग्यवान शहारे, अश्लेष अंबादे, रुपचंद खोब्रागडे, जयंत शहारे, संदेश शहारे, अजय शहारे, बिरला गणवीर, आर. व्ही.मेश्राम, प्रा. राजकुमार भगत, भोजराज
रामटेके, शामराव बडोले, ओमप्रकाश टेंभूर्णे, सावन शहारे, मिथुन शिंपी, पुण्याशिल कोटांगले, संघराज कान्हेकर, प्रमोद वैद्य, राहुल गणवीर आदी उपस्थित होते.

सडक अर्जुनी -तहसीलदार अक्षय पोयाम यांना निवेदन देतांना बौद्ध समाज बांधव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *