परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा – माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांची विधानसभेत मागणी
प्रगत महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राला महायुतीच्या स्वरूपात स्वच्छ व निर्णयाभीमुख प्रशासन मिळाले.
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन दरम्यान राज्याचे माजी मंत्री आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत महामहीम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर होणाऱ्या चर्चेत सहभाग घेत माननीय राज्यपाल महोदयांचे आभार व्यक्त केले. दरम्यान त्यांनी प्रगत महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राला स्वच्छ व निर्णयाभीमुख प्रशासन राज्याला मिळेल यात शंका नसल्याचे मत व्यक्त करत राज्यपाल महोदयांनी आपल्या अभिभाषणात मांडलेल्या विविध मुद्द्यांचा उहापोह त्यांनी विधानसभेत आवर्जून केला.
*परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा – माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले*
संपूर्ण देशात संविधानाचा अमृतमहोत्सव साजरा होत असतांना परभणी येथे विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतीची विटंबना एका माथेफिरू ने केली. भारतीय संविधानाचा अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. भारतीय संविधान हे या देशातील समस्त नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीचा, सामाजिक न्यायाचा जाहीरनामा आहे. विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. जनमाणसात या घटनेचा मोठा उद्रेक होत असून असंतोष उफाळला आहे. आंबेडकरी समाजाने ११ डिसेंबर ला जो बंद पुकारला त्यावेळी झालेली तोडफोड व पोलिसांच्या मारहाणीत एका तरुणाचा झालेला मृत्यू या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ची मागणी राजकुमार बडोले यांनी केली.
*नागपूर येथे पाली भाषेचे विद्यापीठ व्हावे – माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले*
केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला यामुळे ४५० विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र स्थापन करण्यास मदत होईल. मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होईल यासाठी शासनाचे आभार राजकुमार बडोले यांनी मानले मात्र याचसोबत याचसोबत पाली, आसामी आणि बंगाली भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा केंद्रसरकार ने दिला. संपूर्ण जगात बौद्ध तत्त्वज्ञान प्राकृत पाली भाषा भारतीय संस्कृतीच्या मुळाशी आहेत. या अध्यात्म ज्ञान आणि तत्त्वज्ञान च्या भाषा आहेत. नागपूर येथे पाली भाषेचे विद्यापीठ व्हावे अशी मागणी असल्याचे राजकुमार बडोले यांनी विधानसभेत बोलून दाखवत ही मागणी पूर्ण करण्यात यावी अशी मागणी केली.
*रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे काळाची गरज – माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले*
युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी व महिला उद्योजकांना त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात २५ लक्ष रूपये आर्थिक साहाय्य व १ लाख ५३ हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली याबद्दल माननीय राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे राजकुमार बडोले यांनी मानले. सोबतच रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी रोजगार निर्मिती करण्यात यावी अशी मागणी देखील विधानसभेत केली.
यंदा सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देण्यात यावा – माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले
खरीप व रबी पणन हंगाम २०२४-२५ मधे ऐतिहासिक धानाची उचल केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन राजकुमार बडोले यांनी केले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देण्यात यावा. अनुसूचित जाती आणि जमातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी उत्पन्न मर्यादा ८ लक्ष ची अट रद्द करून आर्थिक आणि सामाजिक परिस्तिथि चा विचार करून १०० नामांकित जागतिक विद्यापीठात फ्रिशिप योजना सुरू करावी अशी मागणी राज्यपालांच्या अभिभाषणवर होणाऱ्या चर्चेत माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांनी केली.