महामार्गवरील उडणाऱ्या धुरामुळे अपघाताची शक्यता…
अग्रवाल कंपनी ची लापरवाही आणि वाहन चालकांना होतोय त्रास…
राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर अग्रवाल कंपनी तर्फे उड्डाणपुलाचे काम वर्षभरापासून सुरु आहे. मात्र अग्रवाल कंपनी च्या लापरवाही मुळे सातत्याने नित्कृष्ट दर्जाचे काम होत असून, महामर्गावर धुराचे साम्राज्य बघायला मिळत आहे. त्यामुळे वाहनचालकांना समोरचा रस्ता च दिसत नाही. आणि रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
उड्डाणपुलाच्या कामामुळे आणि महामार्गवर पाणी मारत नसल्यामुळे वाहने जाताच मोठ्या प्रमाणात धूर उडतो. यामुळे विशेषतः दुचाकी चालकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच नेहमी किरकोळ अपघात सुद्धा घडतात. आणि तरीही अग्रवाल कंपनी याकडे दुर्लक्ष करत असून कुठल्याही सोयी सुविधा यादरम्यान देत नाही.