जिल्हा परिषद वरि. प्राथ. शाळा बाम्हणी येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने बहरली सुंदर सेंद्रिय परसबाग

महाराष्ट्र राजनीति शिक्षा

जिल्हा परिषद वरि. प्राथ. शाळा बाम्हणी येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने बहरली सुंदर सेंद्रिय परसबाग
सडक अर्जुनी = जि. प.वरिष्ठ प्राथमिक शाळा बाम्हणी/ख. ही डोंगरगाव/स. केंद्रातील मोठी शाळा. या शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत शाळा व्यावस्थापन समितीच्या पुढाकारात,विध्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मदतीने शाळेत सुंदर सेंद्रिय परसबाग बहरली आहे.परसबाग लागवड करण्याच्या कौशल्याबाबत गावातील प्रगतशील युवा शेतकरी प्रविणभाऊ तवाडे,देवानंद हत्तीमारे,लोकेशजी तरोने, भास्करजी कोरे, गंगाधर वाढई कृषी मित्र शंकरभाऊ चुटे कृषि सखी ललिताबाई चुटे यांनी सर्व मुलांना मार्गदर्शन केले व वेळोवेळी सहकार्य केले.परसबागेत विविध फळ भाज्या, पालेभाज्या चे उत्पादन चालु आहे. त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शालेय पोषण आहारात केला जातो .
परसबाग हा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या उपक्रमाचा एक भाग असला तरी आधुनिक शेती कौशल्याचे ज्ञान व्हावे व व्यवहार ज्ञान वाढावे या उद्देशाने उरलेल्या भाज्यांचे बाम्हणी /ख. येथील आठवडी बाजारात परसबागेतील ताज्या भाजीपाल्याची विक्री स्वतः विधार्थांनी केली व अर्थाजनाचे धडे गिरवले .आपलेच पाल्ये दुकानदार झाले म्हणून आठवडी बाजारात येणारे पालकग्राहक प्रथम विध्यार्थ्यांनी लावलेल्या भाजीच्या दुकानातून पालेभाज्या खरेदी करून कौतुक केले.
परसबाग उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष लेकचंदजी शेंडे उपाध्यक्ष सुषमाताई मेश्राम सदस्य विकासजी खोटेले, प्रदीपजी मेश्राम,जितेंद्र चुटे,धर्मेंद्र रहेले,हंशराज मेश्राम, अजय रहेले,कुरसुंगे, वाढईताई,भेंडारकर ताई,लेंडेताई, ठाकरेताई मरस्कोले ताई, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नेवारे पद. शिक्षक अरुण शिवणकर,गायधणे सर,पद. शिक्षक वलथरे,शिवणकर सर, पटणे सर यांचे योगदान महत्वाचे राहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *