परसबाग स्पर्धेत आपकारीटोला शाळा गोंदिया जिल्ह्यात ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी.
सडक अर्जुनी = शासनामार्फत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविल्या जातात.महाराष्ट्र शासनाने माझी परसबाग सुंदर परसबाग हा उपक्रम आख्या महाराष्ट्रामध्ये राबवित आहे. हिया अनुषंगाने या स्पर्धेमध्ये जिल्ह्यात अनेक शाळांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये सडक अर्जुनी तालुक्यातून प्रथम क्रमांकाने आलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपकारीटोला शाळेने जिल्ह्यामध्ये सुध्धा प्रथम क्रमांक पटकावून सडक अर्जुनी तालुक्याचे नाव लौकीक केले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपकारीटोला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये सतत दोन वर्ष तालुक्यातून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शाळा आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपकारी टोलाच्या या उपक्रमासाठी ग्रामपंचायत शेंडा शाळा व्यवस्थापन समिती आपली तसेच समस्त ग्रामस्थ आपकारिटोला तसेच शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री ललित फुंडे,शालेय पोषण आहार मदतनीस हिराबाई उईके व सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक किशोर बावनकर यांनी कौतुक करून आभार मानले.