AK 47 ने गोळी स्वत:वर गोळी झाडून पोलीस हवालदाराने संपवलं आयुष्य, गोंदिया हादरलं,गोंदिया जिल्ह्यात मागील दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. ज्यात स्वतः पोलीस शिपायाने स्वतः जवळ असलेल्या बंदुकीने गोळी झाळून केली आत्महत्या

अपराध खेल

गोंदिया – AK 47 ने गोळी स्वत:वर गोळी झाडून पोलीस हवालदाराने संपवलं आयुष्य, गोंदिया हादरलं,गोंदिया जिल्ह्यात मागील दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. ज्यात स्वतः पोलीस शिपायाने स्वतः जवळ असलेल्या बंदुकीने गोळी झाळून केली आत्महत्या

गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.नवेगावबांध जवळील एओपी धाबेपवणी येथील घटना घडली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उळबळ उडाली आहे.आत्महत्येचे कारण गुलदस्तात आहे.मात्र ट्रान्सफर झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगांव तालुक्यातील नक्षलग्रस्त भागामध्ये माओवाद्यांच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एओपी बांधण्यात आल्या आहेत.अशातच नवेगाव/बांध पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या धाबे/पवनी येथील एओपीमधील कार्यरत असलेले हेड-कॉन्स्टेबल पदावर कार्यरत जयराम कारू पोरेटी वय 50 वर्ष रा.संभुटोला/कडीकसा तालुका.देवरी.जिल्हा.गोंदिया बक्कल क्रमांक 24 यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.जयराम कोरेट यांनी आपल्या जवळ असलेल्या AK 47 बंदूकाने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. त्यांच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही.काही दिवसांपूर्वीच जयराम कोरेट यांची बदली तिरोडा पोलीस स्टेशन इथं झाली होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.पण पोलीसांनी याबद्दल दुजोरा दिलेला नाही.या घटनेचा अधिक तपास नवेगाव/बांध पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक योगिता चाफले या करीत आहेत. विशेष बाब म्हणजे गोंदिया जिल्ह्यात मागील दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.ज्यात स्वतः पोलीस शिपायाने स्वतः जवळ असलेल्या बंदुकीने गोळी झाळून आत्महत्या केली.त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *