अज्ञान वाहनाच्या धडकेत बिबट मृत्यू

महाराष्ट्र राजनीति

अज्ञान वाहनाच्या धडकेत बिबट मृत्यू
सडक अर्जुनी=वनपरिक्षेत्र सडक अर्जुनी अंतर्गत कोहमारा सहवनक्षेत्रातील बीट खोबा अंतर्गत मौजा खोबा येथील नवेगाव कोहमारा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट मादी अंदाजे दोन वर्ष सायंकाळी आठ वाजता च्या दरम्यान वाहनाच्या धडकेत मृत्यू पावले असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरुणे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी नवेगाव बांध हे मोक्यावर हजर होऊन घटनेची माहिती घेतली सोबत क्षेत्र सहाय्यक व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते सदर बिबट हा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत पावले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले सदर मोव्याचे ठिकाण मोका पंचनामा करण्यात आला असून अज्ञात वाहनाच्या शोध सुरू असून पुढील कारवाई सहाय्यक वनरक्षक वन्यजीव गोंदिया वन विभाग गोंदिया तसेच उपवनसोरक्षक गोंदिया वन विभाग गोंदिया यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *