वसंत विद्यालय डोंगरगाव सडक येथे महात्मा गांधी पुण्यतिथी संपन्न 

महाराष्ट्र राजनीति

वसंत विद्यालय डोंगरगाव सडक येथे महात्मा गांधी पुण्यतिथी संपन्न

आज दिनांक 30 जानेवारी 2025 ला वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव सडक येथे महात्मा गांधी यांची पुण्यतिथी कार्यक्रम करण्यात आला.

सडक अर्जुनी=
याप्रसंगी गांधीजींच्या जीवनावर श्री आर एस लंजे सर यांनी मार्गदर्शनपर माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांनी भाषणे व गाण्यातून आपला सहभाग दर्शवला. प्राचार्य दिवटे यांनी वर्ग 5 ते 11 च्या 50 विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटप केले. पुस्तकांचे वाचन केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी भाषण व निबंध स्पर्धाचे आयोजन दोन दिवसांनी केलेले आहे .या कार्यक्रमाला सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या शेवटी महात्मा गांधींना श्रद्धांज थली वाहून विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली.याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *