जिल्ह्यात लव्ह जिहाद प्रकरण आधी प्रेम, गर्भधारणा नंतर खून लव्ह जिहाद प्रकरणामुळे अनेक हिंदू संघटना आक्रमक

महाराष्ट्र राजनीति

पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया

*प्रेस नोट*

*सोमवार दि-10 फेब्रुवारी 2025*

⏩🔹🔹❇️🔴❇️🔹🔹⏪

पोलीस ठाणे गोरेगाव अंतर्गत मौजा- म्हसगाव देवुटोला शेत शिवारात अनोळखी मुलगी / महीला अंदाजे 20 ते 25 वर्षे हिचा अज्ञात कारणावरून जाळून निर्घृण खुन

अवघ्या काही तासातच आरोपीतास जेरबंद करून खून प्रकरणाचा केला उलगडा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अथक परिश्रम प्रयत्नांनी प्रशंसनीय कामगिरी

▶️ याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, यातील महिला फिर्यादी नामे – सौ. प्रतिमा विजयकुमार मानकर वय 40 वर्षे राहणार – देवुटोला तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया (पोलीस पाटील म्हसगाव ) यांनी तक्रार दिली की, मौजा देवुटोला शेत शिवारात आज घटना दिनांक- 10/02/2025 रोजी चे सकाळी अंदाजे 08.00 वाजता चे पूर्वी एका *अनोळखी मृतक मुलगी/ महीला- वय अंदाजे 20 ते 25 वर्षे वयोगट* हिला कोणीतरी अज्ञात ईसमाने अज्ञात कारणावरुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देश्याने जाळून खून केल्याचे फिर्यादी यांचे तक्रारीवरुन पोलीस ठाणे गोरेगाव येथे अपराध क्रमांक- 49/2025 कलम 103,(1), 238 भा.न्या.सं. 2023 अन्वये वेळ 14.06 वाजता गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे…

⏩…. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव श्री. प्रमोद मडामे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांना तसेच पोलीस ठाणे गोरेगाव चे पोलीस निरीक्षक श्री. अजय भुसारी, यांना निर्देश सूचना देवुन सदर खुनाचा गंभीर गुन्हा करणाऱ्या अज्ञात आरोपीचा तसेच अनोळखी मृतक मुलीची ओळख पटवून तात्काळ शोध घेवून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीस जेरबंद कऱण्याचे निर्देश दिलेले होते….

या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, तसेच पोलीस ठाणे गोरेगाव येथील वेग वेगळी पोलीस पथके आरोपीचे शोधार्थ नेमण्यात आलेली होती… नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाने अतिशय संयमाने, बुध्दीकौशल्य, अथक परिश्रमाने खुनाच्या गुन्ह्याचे अनुषंगाने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरून प्राप्त भौतिक व परिस्थितीजण्य पुरावे, तसेच म्हसगाव गावातील व परिसरातील लोकांना विचारपूस, संशयितांची पडताळणी, तांत्रीक विश्लेषण, आणि प्राप्त सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज यावरून *मृतक मुलगी नामे – पौर्णिमा विनोद नागवंशी वय अंदाजे 18 वर्षे राहणार मानेकसा ( कालिमाटी ) पो. ठाणे आमगाव* येथील असल्याबाबत ओळख पटवण्यात आली….तसेच तिचे नातेवाईक आई- वडील यांना सखोल विचारपूस चौकशी करून अत्यंत कुशलतेने….. मृतक मुलीचा ओळखीचा व खून करणारा पूर्वाश्रमीचा विट भट्टी मालक *आरोपी ईसंम नामे- शकील मुस्तफा सिद्दीकी वय 38 रा. मामा चौक, गोविंदपुर रोड, गोंदिया ता. जिल्हा गोंदिया* यास खुनाच्या गुन्ह्यात दुपारी ताब्यात घेण्यात आले…… आरोपी यास खुनाच्या गंभीर गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपूस चौकशी केली असता आरोपीने मृतक मुलीचा गळा आवळून जाळून खून केल्याचे कबूल केले….. मृतक मुलीला कोणत्या कारणावरून जिवे मारून जाळून तिचा निर्घृण खून केला याबाबात विचारणा केली असता प्रथमदृष्ट्या आरोपी याने सांगीतले की मृतक मुलगी त्याचेपासून गरोदर असल्याचे व मुलगी आरोपी सोबतच राहण्यास इच्छुक असल्याने मुलीपासून आपली सुटका करून घेण्याकरिता तीला जिवे मारण्याचे ठरविले होते.. आणि त्यावरून मृतक मुलीला घटनास्थळ ठिकाण- मौजा देवुटोला (म्हसगाव) शेत शिवारात घेऊन जावून तिचा दुपट्टयाने गळा आवळून तिच्या अंगावर चादर व तनस टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याचे उद्देश्याने तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे……आरोपी यास गोरेगाव पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले असून……गुन्ह्यात अटक पुढील तपास प्रक्रिया गोरेगाव पोलीस करीत आहेत….गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव श्री. प्रमोद मडामे तसेच पो. नि. भुसारी पो. स्टे. गोरेगाव यांचे मार्गदर्शनात मसपोनि- मिरा त्र्यंबके हे करीत आहेत…..

❇️….सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव श्री. प्रमोद मडामे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, सपोनि. धीरज राजूरकर, मपोउपनि वनिता सायकर, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार पोलीस पथक- पोहवा राजू मिश्रा, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, विठ्ठल ठाकरे, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, रियाज शेख, इंद्रजीत बिसेन, प्रकाश गायधने दुर्गेश तिवारी, सुबोध बिसेन, अजय रहांगडाले हंसराज भांडारकर, संतोष केदार, मपोशी स्मिता तोंडरे, पोशी दुर्गेश पाटील चापोशी कुंभलवार, राम खंडारे, तसेच पोलीस ठाणे गोरेगाव- येथील पोलीस निरीक्षक श्री. अजय भुसारी, आणि पोलीस ठाणे गोरेगाव येथील पोलीस पथक, तसेच तांत्रिक सेलचे- पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात सपोनी ओमप्रकाश गेडाम, रोशन येरणे, योगेश रहिले यांनी अथक परिश्रम प्रयत्नांनी आरोपीस जेरबंद करण्याकरिता अथक परिश्रम घेवून खूनाच्या गंभीर गुन्ह्याचा तत्परतेने उलगडा केलेला आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *