सडक अर्जुनी मध्ये वाघ/ बिबट अवयव तस्करी करणारी टोळी वनविभागाच्या ताब्यात
गोंदिया वनविभागांतर्गत सडक/अर्जुनी वनपरिक्षेत्रात वन्यप्राणी वाघ / बिबट तस्करी करून अवयव विक्रि करणारी टोळी वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतली आहे. सविस्तर असे की, पि.जी. कोडापे, विभागीय वनाधिकारी (दक्षता), नागपूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात वाघ/बिबट वन्यप्राण्याचे अवयव विक्रि करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी वनपरिक्षेत्रात सापडा रचुन तसेच बनावट ग्राहक तयार करून आरोपी यांचे सोबत बोलणी करून ग्रामिण रुग्णालय, सडक / अर्जुनी चे जवळील परिसरात आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी, सडक/ अर्जुनी स्थित – कोहमारा येथे आणल्या गेले.
त्यात आरोपी क्रमांक (1) विटल मंगरू सराटी रा. दल्ली ( हलबीटोला) ता.सडक/अर्जुनी जि. गोंदिया यांची अंग झडती घेतली असता त्यांचेकडून एका लाकडी पाटीवर वाघ/ बिबट यांचे मिशा 22 नग व दोन दात, खवले मांजूरचे खवले 1 नग सापडले आहे. तसेच त्यांचेकडून एक देशी कटा (पिस्तुल) सुध्दा हस्तगत करण्यात आले आहे. आरोपी क्रमांक (2) हरीष लक्ष्मण लांडगे रा. मुंडीपार (सडक) ता. साकोली जि. भंडारा व आरोपी क्रमांक (3) घनशाम शामराव ब्राम्हणकर रा. पिपरी/गोंडऊमरी ता. सडक/ अर्जुनी जि. गोंदिया (ह.मु. अर्जुनी/मोरगांव) यांची अंग झडती घेतली असता त्यांचेकडे काहीही आढळूण आले नाही.
आरोपी हे वाघ / बिबट वन्यप्राण्याची शिकार करून त्याचे अवयव विक्रि करण्याचे व्यवसाय करीत आहेत. त्यांनी वन्यजिव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 35, 39, 44, 48 (ए), 49 (बी), 50, 51 अन्वये गुन्हा केला असून त्यांचे विरोधात वन गुन्हा जारी करण्यात आले आहे. त्यांना दिनांक 19.02.2025 रोजी मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक 21.02.2025 पर्यंतवनकोठडी सुनावली आहे. सदर कार्यवाही मध्ये पि. जी. कोडापे, विभागीय वनाधिकारी (दक्षता) नागपूर, पवन जेफ, उपसंचालकनवेगांव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र साकोली, एस. एम. डोंगरवार, सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजिव) गोंदिया वनविभाग, गोंदिया, मिथुन डी. तरोणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सडक / अर्जुनी स्थित कोहमारा, रविकांत भगत, वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक – 1 गोंदिया, कु. सी. बी. भडांगे, वनपरिक्षेत्र अधिकारी डोंगरगांव (वन्यजिव विभाग ) पि. एम. पझारे, वनपरिक्षेत्र अधिकारी विशेषव्याघ्र संरक्षण दल क्रमांक-1 नवेगांवबांध, एस. के. पटले, क्षेत्रसहायक कोहमारा, सी. एस. डोरले, क्षेत्रसहायक रेंगेपार, यु.पी. गोटाफोडे, क्षेत्रसहायक जांभडी, पी.बी. हत्तीमारे, व. र डुग्गीपार, पी. एम. पटले, व.र. सौंदड भाग-2, श्री. एम. व्ही. चव्हान, व.र. कोहमारा, कु. एच.एम. बागळकर, व.र. कनेरी, कु. आय. पी. राऊत, व.र. खोबा, कु. डी. डी. लांजेवार, व. र. मोगर्रा, पी.व्ही. कांबळे,व.र. रेंगेपार व विशेष व्याघ्र संरक्षण दल (STPF) क्र. 1 नवेगांवबांध, समिर बंसोड, वाहन चालक व इतर वनकर्मचारी यांनी
सहकार्यकेले. प्रकरणाचा पुढील तपास प्रमोदकुमार पंचभाई, उपवनसंरक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनात एस. एम.
डोंगरवार, सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजिव) गोंदिया वनविभाग, गोंदिया हे करीत आहेत.