पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
दिनांक 22/02/2025 रोजी गोंदिया जिल्हा पोलीस दादालोरा खिड़की अंतर्गत पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गोंदिया जिल्हा पोलिस दल व GDX Security Solution India Pvt.Ltd. बिलासपुर यांचे संयुक्त विद्यमाने 10 वी व 12 वी पास युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्देशाने भिलाई, रायपुर, बिलासपुर व रायगड येथील नामांकित कंपन्यांच्या सुरक्षा गार्ड, सुरक्षा सुपरवायझर, संगणक ऑपरेटर पदांच्या भरतीसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर रोजगार मेळाव्यामध्ये 140 ते 160 बेरोजगार युवकांनी सहभाग घेतला होता. त्यात 71 युवकांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन मा.गोरख भामरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री.नित्यानंद झा सा. अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, श्री.विवेक पाटील सा.उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री.मंगेश काळे पो.स्टे. डुग्गीपार, पोना महेंद्र सोनवाने, पोशि शैलेश झाडे यांनी केले.