शिवरायांचे विचार आचरणात आणा. आमदार राजकुमार बडोले

मनोरंजन महाराष्ट्र राजनीति

शिवरायांचे विचार आचरणात आणा. आमदार राजकुमार बडोले

कोकणा/जमी ता. सडक अर्जुनी (१९ फेब्रुवारी )
कोकण/जमी येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार तथा माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मनोगत व्यक्त करताना आमदार राजकुमार बडोले यांनी शिवरायांच्या आदर्श कार्याचे स्मरण करुन त्यांच्या आदर्शवत कारभारास डोळ्यासमोर ठेऊन जनतेसाठी कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.

आपण वीर शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत. ही केवळ एक जयंती नाही, तर स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या महापुरुषाच्या कार्याची आठवण ठेवण्याचा सोहळा आहे. आजच्या पिढीने महाराजांच्या शिकवणींना आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांवर चालत आपण देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे असल्याचे सांगीतले.

आजच्या पिढीने महाराजांच्या शिकवणींना आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांवर चालत आपण देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे. शिवरायांचा इतिहास केवळ वाचण्याचा नाही, तो आपल्या आचरणात आणावे असे सांगीतले. सोबतच उपस्थित सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जि.प. सदस्या कविता रंगारी, पं.स. सडक/अर्जुनी सभापती चेतन वडगाये , उपसभापती निशाताई काशिवार,कृ.उ.बा.स सभापती डॉ.अविनाश काशिवार, माजी सभापती संगिता खोब्रागडे, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, पंचायत समिती सदस्य दिपाली मेश्राम , खेमराज भेंडारकर अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती, रविकांत सानप गटविकास अधिकारी पं.स., शिला भेंडारकर, माजी सभापती पं.स. , अमरदिप रोकडे सरपंच ग्रा.पं. कोकणा, रेवदास दरवडे , ईश्वर कोरे, श्री.नेतरामजी देशमुख, कृष्णा भोयर , अशोक गहाणे, लता चांदेवार, दयानंद कोरे पोलीस पाटील आदी पदाधिकारी, स्थानिक नागरिक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *