शशिकरण मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन
शिव पहाडीवर दोन दिवस कार्यक्रम
सडक अर्जुनी = राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर हजारो वर्ष पुरातन शशिकरण देवस्थान विराजित असून, योगीराज धुनीवाले बाबा सेवा समिती च्या वतीने ह्या वर्षी सुद्धा 25 फरवरी 2025 ते 26 फरवरी 2025 ला शिव पहाडी शशिकरण देवस्थान येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
जंगलव्याप्त परिसरात हजारो वर्ष पुरातन काळापासून परंपरागत यात्रा व कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
या कार्यक्रमात सुगत दादा चंद्रिकापूरे ( नेते, शिवसेना एकनाथ शिंदे ) यांच्या हस्ते दीप प्रचलित करून, शिव मूर्तीची पुजा अर्चना करून कार्यक्रम सुरवात करण्यात येईल. माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा, आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते शिवमहापुराण शिवपूजनहोईल. झेंडा वंदन शेंडा जिल्हा परिषद सदस्य चंद्रकला डोंगरवार यांचे हस्ते व गोपाल काला दुपारी 3 वाजता भंडारा गोंदिया लोकसभेचे लाडके खासदार डॉ प्रशांत यादोराव पडोळे यांच्या शुभ हस्ते करण्यात येतं आहे. दिपाली मेश्राम पंचायत समिती सदस्य, महेशजी डुंबरे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होईल.
या कार्यक्रमाला नैनपुर / डुग्गीपार येथील आनंदरावजी कापगते महाराज यांच्या अमृततुल्यवाणीतून दोन दिवसीय भजन पूजन व गोपालकाल्याचा कार्यक्रम संपन्न होईल.
ह्या कार्यक्रमाला ग्राम डूग्गीपार, देवपायली, मोगरा, मंदीटोला, राजगुडा, बाम्हणी / खडकी, कोहमारा, सडक / अर्जुनी येथिल हजारों भविक भक्ताच्या उपस्थीत कार्यक्रम संपन्न होईल.
समितीचे महेश डुंबरे, सुखदेव ठाकूर देवीदास कोवें, राहुल वणवे, सौरभ बडोले, राकेश नंदागवली, डूडीस्वर लांजेवार यांनी संपूर्ण भाविक भक्तांना विनंती केली आहे की, देवपायली वरुण मंदिरात येण्याकरीता सर्व्हिस रोड तयार कऱण्यात आला आहे त्या सर्व्हिस रोड नी भाविक भक्तांनी मंदिरात यावं
योगीराज धूनीवाले बाबा सेवा समितीचे
सचिव
देवीदास कोवें
15 वर्ष झाले मोरगाव / अर्जुनी विधानंसभा क्षेत्राचा प्रतिनिधित्व करत सडक / अर्जुनी येथील विद्यमान आमदार माजी आमदार माजी मंत्री हे असताना सुद्धा देवस्थानाचा सौंदर्यकरण करण्यात आलं नाही ही एक सुखांतिक आहे. मंदिर आदिवासी समाजाचा आराध्य दैवत असल्यामुळे जनप्रतिनिधी आमदार खासदार सौंदर्यकरणाकडे लक्ष देत नाही असा माझा आरोप आहे.
महाराज सुखदेव ठाकूर
योगीराज धूनीवाले बाबा सेवा समिती
हर सोमवारला हजारो भाविकानी मंदिरात येतात दर सोमवार बुधवार ला भाविकांची अलोट गर्दी असते
मंदिराच सौदरीकरण करणे अत्यंत गरजेचं आहेः