सौन्दड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारतीचे करण्यात आले लोकार्पण
. सडक अर्जुनी
*विशेष म्हणजे… परिसरातील जनतेला लोकार्पण सोहळ्याची माहिती न देता व पत्रिका न काढता कोणत्याही वृत्तपत्रात माहिती न देता तालुक्यातील पत्रकारांनाही न बोलवता करण्यात आला एवढा मोठा लोकार्पण सोहळा*
गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौन्दड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयच्या इमारतीचे ई – लोकार्पण गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री तथा राज्याचे सहकार मंत्री बाबा साहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून या लोकार्पण सोहळ्यात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले हे देखील उपस्थित होते.
सौन्दळ या ठिकाणी असेलला ग्रामीण रुणालय हा जीर्ण अवस्थेत आल्याने या ठिकाणी ११ कोटी ५६ लक्ष रुपये खर्चुन नव्याने रुग्णालयात उभारण्यात आला यात ३० खाटांचे अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णलाय उभारण्यात आले आहे तर विशेष बाबा म्हणजे या रुग्णालयात रुग्णांना खालून वरच्या माळ्यावर जाण्यासाठी लिफ्ट देखील लावण्यात आली आहे ,तर सौन्दळ हा गाव राष्ट्रीय महामार्गावर असलयाने रस्त्यावर एखादा अपघात झाल्यास या ठिकाणी रुग्ण आल्यास रुग्णालयात वेळीच उपचार करता येतील तर परिशरातील नागरिकांना देखील याचा फायदा होणार असल्याचे आमदार राजकुमार बडोले म्हणाले.
या कार्यक्रमाला उपस्थित
राजकुमार बडोले आमदार माजी मंत्री
डॉ अमरिश मोहबे जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया
हर्ष मोदी सरपंच सौन्दळ .चेतन वडगावे सभापती पंचायत समिती सडक अर्जुनी,
तर या लोकार्पण सोहळ्याला गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर,मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरूगनाथम जिल्हा शल्य चिकित्सक अमरीश मोहबे ,यांच्या शह अनेक लोक उपस्थित होते तर या रुग्णालयात आलेल्या रुग्णांना योग्य त्या सुविधा वेळीच मिळाल्या पाहिजे अश्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि आमदार राजकुमार बडोले यांनी अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना दिल्या आहेत.
