दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
विद्यार्थ्यांना दुसरीच प्रश्नपत्रिका : डोंगरगाव / सडक परीक्षा केंद्रावरील प्रकार
सडक अर्जुनी : शालांत परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा २१ एप्रिलपासून सुरू झाली आहे. अलीकडे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरू असल्याचा ऊहापोह शिक्षण यंत्रणा करीत आहे. मात्र दुसरीकडे शिक्षण यंत्रणेच्या लापरवाहीमुळे सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव/सडक या केंद्रावरील दहावीच्या तब्बल २० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काल (ता. १) शनिवार, इंग्रजीचा पेपर घेण्यात आला. मात्र डोंगरगाव केंद्रातील वर्गखोली ७मधील २० विद्यार्थ्यांना एल-३ च्या ऐवजी एल-१ प्रकाराचे पेपर देण्यात आले. यामुळेया वर्गखोलीतील एकही विद्यार्थी पेपर सोडवू शकला नाही. असे असले तरी या प्रकरणाला सारवासारव करण्याचा प्रयत्न शिक्षण यंत्रणेकडून केला जात आहे. त्यामुळे विद्याथ्यर्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. जिल्ह्यात ९८ केंद्राच्या माध्यमातून परीक्षा घेतली जात आहे. काल, १ मार्च रोजी इंग्रजी विषयाचा
पेपर होता. दरम्यान मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा ही तृतीय भाषेत मोडते. तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही भाषा प्रथम भाषा म्हणून गणली जाते. त्यानुरूप परीक्षा मंडळाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एल-१, एल-२ आणि एल-३ अशा तीन प्रकारचे प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात. सडक अर्जुनी तालुक्यातील वसंत हायस्कूल डोंगरगाव येथे दहावीचे परीक्षा केंद्र आहे. वर्गखोली ७ मध्ये २० विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था होती. परीक्षेच्या वेळेवर विद्यार्थ्यांच्या हाती इंग्रजीची प्रश्नपत्रिका देण्यात आली. मात्र प्रश्नपत्रिकेत नियमित अभ्यासक्रमाचे एकही प्रश्न दिसून आले नाही. ती प्रश्नपत्रिका एल-१ प्रकाराची होती. खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांना एल-३ प्रकाराची प्रश्नपत्रिका पाहिजे होती. त्यातच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षकाकडे काहीच समजत नसल्याची तक्रार केली. मात्र शिक्षक
केंद्र संचालकांनी काढले शिक्षणाचेच वाभाडे
सडक अर्जुनी तालुक्यातील वसंत हायस्कूल डोंगरगाव/सडक येथे परीक्षा देत असलेल्या २० विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या प्रकाराला घेवून दै. देशोन्नतीच्या प्रस्तूत प्रतिनिधीने भ्रमणध्वनीवरून केंद्र संचालक तथा प्राचार्य दिवटे यांच्याशी चर्चा केली. दरम्यान घडलेल्या प्रकारातून यंत्रणेची चूक झाली, हे मान्य करण्याऐवजी त्यांनी शिक्षणाचेच वाभाडे काढले, परिक्षार्थी विद्यार्थ्यांना काहीच येत नाही, माझे इतक्या वर्षाचे अनुभव आहे. ज्यांना जे जमले ते लिहले, अशा घटना घडत राहतात. असे बोलून या प्रकारावर पाणी ओतण्याचे काम केले. तसेच त्यांनी शिक्षण विभागाचेच वाभाडे काढले. यावरून गोंदिया जिल्ह्यातील शाळांमध्ये दिलेले जात असलेले शिक्षणाचे धडे आणि शालेय शिक्षण नावालाच सुरू असल्याचे त्यांनी बोलून सांगितले. त्यामुळे प्राचार्य दिवटे हे झालेल्या गैरप्रकाराला घेवून किती गंभीर आहेत, हे देखील उघडकीस आले आहे.
या प्रकाराची माहिती मिळाली आहे. त्या अनुसंगाने शिक्षण विभागाचे पथक त्या केंद्रावर पाठविण्यात आले होते. त्या बाबतची चौकशी करण्यात येणार आहे, तशा सुचनाही परीक्षा मंडळाला देण्यात आले आहे. यात कुणाची
चुक आहे, हे चौकशीनंतरच कळेल.
-डॉ. महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी गोंदिया
” या प्रभ्रमणध्वनीवर झालेल्या संभाषणाला घेवून आपण दिलगिरी व्यक्त करतो. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, याबाबत आपण पाठपुरावा करू.
– दिवटे, प्राचार्य तथा केंद्र संचालक
आणि केंद्र संचालकानी विद्यार्थ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. ३ तास चाललेल्या पेपरमध्ये त्या विद्यार्थ्यांना काहीच सोडविता
आले नाही. त्यातील काही प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला. पेपरचा कालावधी संपल्यानंतर इतर विद्यार्थ्यांकडी
शिक्षणाधिकारी कार्यालयाकडूनही दुर्लक्ष
काल, पेपर सुटल्यानंतर वर्गखोली ७ मध्ये दुसरीच प्रश्नपत्रिका देण्यात आली असल्याची बाब समोर आली. यामुळे यंत्रणेत एकच खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती गटशिक्षणाधिकारीसह गोंदिया जि. प. चे शिक्षण अधिकारी यांच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. दरम्यान झाले गेले पार पडले’ या धोरणातून शिक्षण विभागाने या गंभीर प्रकाराचे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.
प्रश्नपत्रिका व वर्गखाली७ मध्ये बसून परीक्षा
देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेत तफावत दिसून आली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. हा प्रकार लक्षात येताच परीक्षा केंद्र संचालक व शिक्षण यंत्रणेतही खळबळ उडाली. मात्र परीक्षा नियंत्रित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती काहीच राहिले नाही नसल्यामुळे झाले गेले पार पडले’ या फार्म्युल्यातून या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आले. एंकदरीत शिक्षण यंत्रणेच्या लापरवाहीमुळे २० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकाराचा जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे