माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आरोग्य विषयावर वेधले विधानसभेचे लक्ष्य
रिक्त पदभरती, नियुक्ती तसेच आवश्यक साहित्य आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून द्या : माजी मंत्री राजकुमार बडोले
कॅन्सरच्या प्राथमिक चाचण्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या : माजी मंत्री राजकुमार बडोले
प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ मुंबई येथे सुरू असून राज्याचे माजी मंत्री तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी मधे आरोग्य विषयक समस्यांवर सदनाचे लक्ष्य वेधले. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन अदा करण्यासाठी केलेल्या तरतुदीसाठी त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले. सोबतच जिल्हातील आणि राज्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र मधे नर्स, सहायक तंत्रज्ञ, सफाई कर्मचारी, इतर इत्यादी पदे अद्याप रिक्त असून अनेक उमेदवार नियुक्तीची वाट बघत आहेत त्यांना नियुक्ती देऊन ती पदे तत्काळ भरण्यात यावीत. आरोग्य केंद्रांमधे आवश्यक फर्निचर, यंत्र सामुग्री, इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात यावीत. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात दोन उपजिल्हा रुग्णालय मंजूर असून रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे प्रमाण वाढले असून नागरिकांची पायपीट थांबवण्यासाठी सुरुवातीच्या चाचण्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी देखील माजी मंत्री आणि आमदार राजकुमार बडोले यांनी केली आहे.