महिला मेळाव्यात महिलांचा भव्य सत्कार; हर्ष मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वी

खेल मनोरंजन महाराष्ट्र राजनीति

महिला मेळाव्यात महिलांचा भव्य सत्कार; हर्ष मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वी

सौंदड: जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने ८ मार्च रोजी सौंदड येथील शिवमंदिर परिसरात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील महिलांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. हर्ष मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात २०० हून अधिक महिलांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मा. शारदाताई बडोले यांनी भूषवली, तर उद्घाटन मा. सीताताई राहंगळे (भाजपा जिल्हा महामंत्री, गोंदिया जिल्हा) व मा. निशाताई काशीवार (उपसभापती, पंचायत समिती सडक अर्जुनी) यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख उपस्थिती:
• मा. वर्षाताई शाहारे (प.स. सदस्य)
• मा. रूपालीताई टेंभुर्णे (माजी जिल्हा परिषद सदस्य)
• मा. ज्योतीताई इरले (योग शिक्षिका)
• मा. मंजूताई डोंगरवार (माजी प.स. सदस्य)
मा. संध्या ताई डोंगरवार, जिला संयोजिका, सुपर वुमन”
• मा. सीमाताई निंबेकर (पोलीस पाटील, सौंदड)

हर्ष मोदी (सरपंच, सौंदड) यांनी उपस्थित महिलांचे स्वागत करत संस्थेच्या महिला सबलीकरणासाठीच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.

मेळाव्यात रांगोळी, पाककला, हस्तकला, भावगीत, वेषभूषा यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. यावेळी अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, उमेद, महिला बचत गटाच्या सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुण्यांमध्ये:
अस्मिता मेंढे, अर्चना चन्ने, प्रमिला निर्वाण, सुषमा राऊत, कुंदा साखरे, समीता इरले, सलोनी मोदी, स्नेहा मोदी, कल्पना गायधणे, नीता डोंगरवार, मंजूर इरले, अंजु इरले, वंदना खडके आदींचा समावेश होता.

सन्मानित महिला:
भानारकर, संगीता जणबंधू, किरण मेश्राम, वर्षा राऊत, मीरा चांदेवार, अनिता चुटे, शालू राऊत, कमला बडोले, तनुजा राऊत, करिष्मा टेंभुर्णे, वर्षा बडोले, विशाखा जांभुळकर, चंद्रकला निंबेकर, अंकिता भयसारे आदींना सन्मानित करण्यात आले.

संस्थेचे पदाधिकारी:
उषा राऊत, निशा शिवणकर, संगीता खेकरे, मनीषा निंबेकर, गीता किरणापुरे, प्रियांका चोपकर, लता बैस, छाया बनकर, सीमा टेंभुर्णे, शोभा चोपकर, वर्षा मांडारकर, जोसना कोचे, स्वेता कडू, हर्षा ब्राम्हणकर, अर्चना डोंगरवार यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजू भोई यांनी केले, संचालन ऍड. रिता इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन पूजा राऊत यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले:
संदीप मोदी, चरणदास शाहारे, शंकर खेकरे, खुशाल ब्राम्हणकर, विजय चोपकर, ज्ञानीराम किरणापुरे, शिवा शीरसागर, त्रीशरण शाहारे, देवेंद्र शिवणकर, रमेश बनकर, मदन साखरे, राकेश कोचे, संदीप मारवाडे, हिमांशू राऊत, सदाशिव विठ्ठले, हर्षित शाहारे, सावलराम इरले, धर्मराज शेंडे आदींनी.

सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तसेच उपस्थितांसाठी अल्पोपहाराचीही विशेष सोय करण्यात आली होती.

जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्था, सौंदड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *