रेती चोरावर तात्काळ कारवाई तहसीलदार प्रेरणा कटरे यांची कारवाई

खेल महाराष्ट्र राजनीति

रेती चोरावर तात्काळ कारवाई

तहसीलदार प्रेरणा कटरे यांची कारवाई

सडक अर्जुनी:–तालुक्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सहवनक्षेत्र खटकी बामणी अंतर्गत येणाऱ्या जंगलातून वाहणाऱ्या रेती घाटातून जप्त करून सडक अर्जुनी तहसील कार्यालयात लावण्यात आले. ट्रॅक्टर मालक राजेश कोरे, सुरेश कोरे, यांचे दोन ट्रॅक्टर जमा करून 10 लाखाच्या मुद्देमालासह जप्त करण्यात आला. या कारवाईत तलाठी उमेश रहांगडाले, कुरेशी, विकी पवनकर, हनुमंत आंबेकर हे तलाठी उपस्थित होते.नाल्यासह तालुक्यातील वनविभागाचे अन्य नाल्यातील शेकडो ट्रिप रेती दिवसा व रात्रीच्या सुमारास उपसा करून रेती चोरट्यांनी वाहतूक करून लंपास केली आहे.मात्र याकडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.रेती चोरी केलेल्या नाल्याच्या ठिकाणावर आजही पाऊलखुणा दिसून येतात.हे मात्र खरे रेती चोरट्यांनी सडक अर्जुनी तालुक्यात सहवन क्षेत्रातील खडकी बामणी शेतशिवारात जाणाऱ्या घाट नाल्यातून शेकडो ट्रिप रेतीचा उपसा करून रेती वाहतूक केली असून याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.या अवैध रेती उपसा व्यवसाय जोमात सुरू असून शासनाच्या महसूल ला लाखो रुपयांचे चुना लागत आहे.त्यामुळे या रेती चोरीला वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे अभय असून त्यांचेच आशिर्वादाने रेतीचा व्यवसाय जोमात सुरू असल्याची जनमानसात चर्चा आहे. ‌ ‌ तालुक्यातील वनविभागाचे हद्दीतील नाल्यातून रेती तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून रेती तस्करी बदल्यात अधिकारी व कर्मचारी यांचे रेती तस्करांशी आर्थिक व्यवहार होत होत असल्याची चर्चा आहे.तालुक्यातील कोसमतोंडी,मालीजुंगा,रेंगेंपार, चिरचाळी नाला, पांढरी,हलबीटोला,डव्वा,कोहमारा शशिकरण नाला,वडेगाव डोयेटोली नाला, घोगरा घाट नाला,घाटबोरी,हल्दीघाट,बौद्धनगर,सितेपार,घटेगाव, जांभळी दोडके,म्हसवानी,बोथली या नाल्यातून रेती उपसा होत आहे.वनविभागाचे हद्दीतील नाल्यातून अवैधरित्या दिवसा व रात्रीच्या वेळी रेती उपसा करून वाहतूक केली जाते.पण वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळे होऊन धृतराष्ट्र झाले आहेत.रेती तस्करांनी वनविभागाचे हद्दीतील नाल्यातून शेकडो ट्रिप रेतीचा उपसा करून आपला व्यवसाय जोमात सुरू केला आहे.रेतीचा व्यवसाय जोमात सुरू असून या बदल्यात अर्थ व्यवहार करत हात ओले करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत असल्याची चर्चा आहे.वनविभागाचे नाल्यामधून रेती चोरी होत असून कारवाई होतांना दिसत नाही.त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *