शेतकऱ्यांच्या उन्हाळी धान पिकाला 24 तास विद्युत पुरवठा द्या
खासदार डॉ प्रशांत पडोळे यांची
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. बाबासाहेब पाटील, यांच्या कडे मागणी
गोंदिया = जिल्हाच्या आणि मतदार संघातील समस्या निकाली काढण्यासाठी आज प्रत्यक्ष आढावा बैठकीत उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी चर्चा केली, शेतकऱ्यांच्या उन्हाळी भातपिकासाठी 24 तास लाईन देण्यात यावी अशी मागणी मा.पालकमंत्री गोंदिया यांना केली. तसेच मतदार संघाच्या विकासासाठी मतभेद न करता भरिव निधी देण्यात यावी, सोसायटी शेतकऱ्यांना मार्च महिन्यापर्यंत कर्ज भरण्याची मुदत न देता ती एप्रिल प्र करण्यात यावी, मतदार संघातील अधुरे कामे पूर्ण झाली पाहिजेत, (त्यात रस्ते, ओव्हर ब्रीज, जनसुविधा, खनिज) ची कामे झाली पाहिजेत, आणि ज्या समस्या आहेत त्या तातळीने सोडवाव्यात. आणि जनतेला न्याय द्यावा.
गोंदिया जिल्ह्यातील विविध समस्या यावेळी मांडल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. बाबासाहेब पाटील,
माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खा. प्रफुलभाई पटेल,
मा.जिल्हाधिकारी गोंदिया, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया, मा.मुख्य अधिकारी गोंदिया, यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.