जवाहर नवोदय विद्यालयात निवड
सडक अर्जुनी= वसंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव सडक येथील क्रिश भरत मरसकोल्हे वर्ग 5 वी त सत्र 2024- 25 मध्ये शिकत आहे त्याची जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव बांध येथे सञ 2025-26 वर्ग 6 वीत प्रवेशाकरीता निवड झाली आहे. विद्यार्थ्याने घवघवीत हे संपादन केले. त्याने आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे सचिव आदरणीय खेमराजजी देशमुख, प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आई, वडील यांना दिले आहे, विद्यार्थ्यांचे,आई, वडीलांचे विद्यालयातर्फे अभिनंदन केले आहे.