शेतकऱ्यांचा सडक अर्जुनी येथिल महावितरण वीज कार्यालयात ठिय्या आंदोलन

देश महाराष्ट्र राजनीति विदेश शिक्षा स्वास्थ्य

शेतकऱ्यांचा सडक अर्जुनी येथिल महावितरण वीज कार्यालयात ठिय्या आंदोलन

सडक अर्जुनी=
मागील अनेक दिवसांपासून डव्वा विद्युत उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावात विजेची समस्या असल्याने परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आज सडक अर्जुनी येथील विद्युत कार्यालयात ठिय्या आंदोलन केला.
कडाक्याची ऊन, पिण्याच्या पाण्याची समस्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा उन्हाळ्यात नवीन नाही. परंतु डव्वा उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये मुख्यतः खजरी,चिरचाडी व रेंगेपार भागात विजेचा दाब कमी असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करता येत नाही. तसेच शेतकऱ्यांना शेतामध्ये पाण्याची कमालीची अडचण होत आहे.
वारंवार निवेदन देऊनही महावितरण च्या कर्मचाऱ्यांनी सदर समस्या कडे दुर्लक्ष केले त्यामुळे क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांचे निवासस्थानी दिनांक 05 मार्च 2025 ला बैठक घेण्यात आली. या बैठकीत महावितरणचे अधिकारी राठोड, फुललेले, रेवतकर व सर्व अभियंता उपस्थित होते. तालुक्यातील विजेच्या संदर्भातील सर्व समस्या नागरिकांच्या वतीने या बैठकीत मांडण्यात आल्या होत्या व या सर्व समस्या मार्गी लावण्याच्या सूचना आमदार बडोले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या परंतु आज 22 दिवस लोटूनही समस्या मार्गी न लागल्याने नागरिकांनी सडक अर्जुनीचे सहाय्यक अभियंता रेवतकर यांचे दालनात ठिय्या आंदोलन केला. यावेळी मुख्य अभियंता फुलझेले यांना देवरी येथून बोलावण्यात आले होते.
कार्यकारी अभियंता व महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर नागरिकांनी आपापल्या मागण्या मांडल्या. यात प्रामुख्याने आमगाव उपकेंद्र बंद असल्याने मोहाडी येथील वळवलेली डव्वा येथील वीज बंद करावी व क्षेत्रात विजेचा दाब सुरळीत राहावा जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीपंपाची व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करता येईल या प्रमुख मागण्या मांडल्या.
अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून प्रमुख मागण्या मार्गी लावल्याने आंदोलन मागे घेण्यात आला. येत्या पाच दिवसात विजेचा दाब व्यवस्थित न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांच्या वतीने यावेळी गौरेश बावनकर, किशोर डोंगरवार, प्रशांत झिंगरे, राजेश कबगते, जगदीश डोंगरवार व रंगेपार येथील सरपंच यांनी क्षेत्रातील समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

प्रतिक्रिया :- *वारंवार होणारा त्रास लक्षात घेता मोहाडी येथील डव्वा उपकेंद्रातून गेलेली अतिरिक्त वीज बंद केल्यास परिसरातील नागरिकांना योग्य ती वीज मिळू शकते व खोडशिवनी येथील उपकेंद्र सुरू झाल्यास संपूर्ण तालुक्यातील विजेची समस्या मार्गी लागू शकते सदर समस्या येत्या पाच दिवसात मार्गी न लागल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल व त्या आंदोलनात अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी महावितरण अधिकाऱ्यांची राहील.*
*-गौरेश बावणकर (शेतकरी)*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *