करियर करोबार खेल देश मनोरंजन महाराष्ट्र राजनीति लाइफस्टाइल विदेश शिक्षा स्वास्थ्य

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करीता ग्रामसभा व एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांचा पुढाकार…

सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभा सदस्यांसाठी प्रशिक्षण व शिवारफेरीचे आयोजन.

गोंदिया, / सडक अर्जुनी

02 एप्रिल 2025: अनुसूचित जाती-जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना वनहक्क अधिनियम 2006 (FRA 2006) अंतर्गत मान्यता प्राप्त झालेल्या सामूहिक वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CRRMC) आणि ग्रामसभा सदस्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने वन हक्क कायद्यातील अधिकार व जबाबदाऱ्या यावर प्रशिक्षण व गावाच्या कल्याना करीता कायद्यातील तरतुदीनुसार कमांचे नियोजन याकरिता शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले.

ही कार्यशाळा ग्राम पांढरी, व गल्लटोला तालुका सालेकसा, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र येथे संपन्न झाले. या उपक्रमात सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (ग्रामसभा), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व संबंधित शासकीय विभाग, तसेच विविध सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग होता.

कार्यक्रमाची उद्दिष्टे:

1. वनहक्क अधिनियम 2006 (FRA 2006) मधील प्राप्त अधिकार, कर्तव्य व जबाबदारी यावर ग्रामसभंची भूमिका :

FRA 2006 कायद्याची संपूर्ण माहिती

वनहक्क मान्यता प्रक्रिया आणि त्याच्या अंमलबजावणीसंदर्भातील मार्गदर्शन

ग्रामसभा आणि समित्यांची भूमिका व जबाबदाऱ्या

 

2. वनाचे व्यवस्थापन व शाश्वत उपजीविका निर्माण करणे:

सामूहिक वनहक्कात प्राप्त क्षेत्राचे व्यवस्थापनासाठी आवश्यक धोरणे व अंमलबजावणी प्रक्रिया

वनसंवर्धनासाठी आवश्यक नियोजन, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि जैवविविधतेचे महत्त्व

वनहक्क असलेल्या समुदायांसाठी वनसंपत्तीचा शाश्वत उपयोग

 

3. प्रशिक्षण व शिवारफेरी:

प्रत्यक्ष स्थळावर जाऊन सामूहिक वनहक्क व्यवस्थापनाच्या यशस्वी उदाहरणांचा अभ्यास

गावांच्या स्तरावर वनसंपत्तीचा नियोजनबद्ध वापर करण्याच्या उपाययोजना

गावकऱ्यांसाठी अनुभवाधारित चर्चा आणि मार्गदर्शन

 

कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:

या प्रशिक्षण कार्यक्रमात खालील मान्यवरांची उपस्थिती होती:

ग्रामसभा पदाधिकारी सदस्य,ग्रामसेवक, तलाठी तालुका समन्वयक आदिवासी विभाग, जितेश माहुले जिल्हा समन्वयक, आदिवासी विकास विभाग तसेच संचालक वनपीपल फॉउंडेशन – श्री ललित भांडारकर

वनविपुल फाउंडेशनचे संचालक – श्री कामेश भोरजारे

कार्यक्रमाचे आयोजन आणि सहकार्य:

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी, जिल्हा गोंदिया यांच्या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. वनपीपल फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे या उपक्रमात विशेष सहकार्य असून, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे महत्त्व:
हा उपक्रम FRA 2006 अंतर्गत मिळालेल्या सामूहिक वनहक्काच्या सुरक्षित व योग्य व्यवस्थापनासाठी गावपातळीवर जागरूकता आणि जबाबदारी निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. वनसंवर्धनासोबतच आदिवासी व पारंपरिक वननिवासी समुदायाच्या आर्थिक विकासास चालना देण्यास मदत करणारे धोरण आखण्यासही हा कार्यक्रम उपयोगी ठरेल असे उपस्थित मान्यवराचे म्हणणे होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *