शशिकरन देवस्थानात रामनवमी निमीत्त दोन दिवसीय कार्यक्रम
शशीकरणं देवस्थानं विकासाच्या प्रतिक्षेत
सडक अर्जुनी=
मुन्नासिंह ठाकूर
महामार्ग क्रमांक 53 वर हजारो वर्ष पुरातन आदिवासी समाजाचे आराध्य दैवत असलेले जंगलव्याप्त परिसरात शशी किरण देवस्थान आहे ह्या देवस्थानाला कोणतेही जण प्रतिनिधीचे लक्ष नसल्यामुळे मंदिर विकासाच्या प्रतीक प्रतीक्षेत आहे
रामनवमीनिमित्त दिनांक 6 एप्रिल 2024 ला मंदिरामध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन मंदिर समितीचे अध्यक्ष तुकाराम कुरसुंगे यांच्या मार्गदर्शनात संपन्न होत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मंदिरामध्ये पाच एप्रिल 2024 ला ज्योतप्रज्वलित करून रामनवमी चा कार्यक्रम होत आहे सहा एप्रिल 2024 ला महाप्रसाद गोपालकाला ज्योती विसर्जन चा कार्यक्रम करण्यात येईल या कार्यक्रमात मंदिर समितीचे संपूर्ण पदाधिकारी भाविक भक्त त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होईल
या मंदिरामध्ये पहाडावर गडावर महादेवाचा स्थान आहे वाघाची भव्य गुफा राणी मातेचे मंदिर गडमाथा देव बाबा गुरुबाबा सत्यकरण बाबा राणी माता चंडिका माता भस्मडोह असे विविध देवांचे आराध्य स्थान जागरूक शशी किरण देवस्थान विराजित योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट च्या वतीने करण्यात येत आहे
मंदिराला अजून पर्यंत अजून पर्यंत जनप्रतिनिधीचे पाठबळ नसल्यामुळे किंवा आदिवासी समाजाचे आराध्य दैवत असल्यामुळे या मंदिराला सौंदर्य करण्याची गरज असून सुद्धा जनप्रतिनिधी मंदिराकडे लक्ष देत नाही ही एक शोकांतिका समितीच्या लोकांकडून वर्तवली जात आहे
शशिकांतन मंदिराजवळ मात्र चार किलोमीटर अंतरावर असलेले विद्यमान आमदार पूर्व सामाजिक न्याय मंत्री यांचे निवासस्थान असून सुद्धा मंदिराला कोणतीही सोयीसुविधा अजून पर्यंत करण्यात आली नाही विद्यमान आमदार राजकुमार बडोले यांनी पिण्याच्या पाण्याकरिता मात्र एक बोरवेलची सोय करून दिली ती बोरवेल मागील दोन महिन्यापासून बंद पडून असल्यामुळे भाविक भक्तांची पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत
मंदिरामध्ये कोणतेही इलेक्शन असले तर जनप्रतिनिधी यांची धावपळ असते या मंदिरामध्ये नवरात्रीला नऊ दिवसाचे अखंड ज्याती जाळली जाते. एक दिवसानिमित्त भव्य यात्रेचे आयोजन होत असते दर सोमवारला दर बुधवारला भाविकांची अलोड गर्दी असते मंदिरामध्ये नवस पूजा अर्चना जेवण पिकनिक शाळेचे सहल येत असतात
गोंदिया जिल्ह्यातील महामार्ग क्रमांक 53 वरील जागृत शशिकिरण देवस्थान विकासाच्या प्रतीक्षेत पाहायला मिळतं
मंदिरामध्ये भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही
स्थानिक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य विद्यमान आमदार व जनप्रतिनिधी यांनी मंदिराकडे मंदिराच्या सौंदर्य करण्याकडे लक्ष देऊन भाविक भक्तांची होणारी गैरसोय दूर करावी मंदिराचे सौंदर्य करण करावे अशी मागणी समितीच्या पदाधिकारी यांनी केली आहे
